स्कोडाला जॅकपॉटच लागला! कायलॅकवरचा जीएसटी १.१९ लाखांनी कमी झाला; कुशाक, स्लाव्हिया अन् कोडियाक...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:43 IST2025-09-11T13:43:07+5:302025-09-11T13:43:44+5:30
Skoda Prices After GST Cut: जेव्हापासून लाँच झालीय, तेव्हापासून कायलॅक स्कोडाची सर्वाधिक खपाची कार बनलेली आहे. या कपातीमुळे स्कोडाच्या हाती घबाडच लागले आहे.

स्कोडाला जॅकपॉटच लागला! कायलॅकवरचा जीएसटी १.१९ लाखांनी कमी झाला; कुशाक, स्लाव्हिया अन् कोडियाक...
जीएसटी कपातीमुळे स्कोडा कंपनीचा मोठा फायदा होणार आहे. त्यांची सर्वात स्वस्त असलेली स्कोडा कायलॅक जवळपास १.१९ लाखांनी स्वस्त होणार आहे. जेव्हापासून लाँच झालीय, तेव्हापासून कायलॅक स्कोडाची सर्वाधिक खपाची कार बनलेली आहे. या कपातीमुळे स्कोडाच्या हाती घबाडच लागले आहे.
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार?
स्कोडाच्या कुशाक, स्लॅव्हियाला म्हणावा तसा फायदा दिसत नाहीय. कारण या कार ४० टक्क्यांच्या जीएसटीमध्ये येत आहेत. सध्या कंपनी २१ सप्टेंबरपर्यंत काही ऑफरही देत आहे. २२ सप्टेंबरपासून स्कोडाच्या कारवर जीएसटी कपातीनंतरचे दर लागू होणार आहेत.
स्कोडा कायलॅकवरील जीएसटी २९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला आहे. यामुळे या कारवर 1,19,295 रुपयांचा फायदा होणार आहे. स्लॅव्हियावर ४५ टक्क्यांचा जीएसटी ४० टक्के झाला आहे. यामुळे या कारवर 63,207 रुपये जीएसटी कपात होणार आहे. कुशाकवर देखील ४० टक्के जीएसटी लागणार आहे. यामुळे या कारची किंमत 65,828 रुपयांनी कमी होईल.
सर्वाधिक फायदा हा कायलॅक आणि कोडियाक या कारवर होणार आहे. कोडियाकवर 3,28,267 रुपयांपर्यंत जीएसटी कपात होणार आहे. सध्या कोडियाकवर ५० टक्के जीएसटी लागत होता. तो आता ४० टक्के झाला आहे.