शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Simple One: सो सिंपल! केवळ 1,947 रुपयांत बुक करा 240 किमी रेंजवाली स्कूटर; 15 ऑगस्टला होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 12:07 IST

Simple One launch on 15 august ई स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये विकली जाणार आहे. या राज्यांच्या शहरात एक्सपिरिअन्स सेंटर साठी जागा निवडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे असण्याची शक्यता आहे.

Simple One Electric Scooter भारतात लाँच होण्यासाठी तयार आहे. 15 ऑगस्टला भारतात दोन ईलेक्ट्रीक स्कूटरची एन्ट्री होणार आहे. यामध्ये सिंपल आणि ओलाच्या स्कूटर असणार आहेत. ओलाच्या स्कूटरला जबरदस्त प्रतिसाद असला तरीदेखील सिंपल एनर्जीची स्कूटर देखील काही कमी नाही. 15 ऑगस्टपासून या स्कूटरचे बुकिंग सुरु होणार आहे. (SIMPLE ENERGY TO OPEN ORDER BOOKS FOR SIMPLE ONE ELECTRIC SCOOTER ON 15 AUGUST)

Simple One EV: 240 किमी रेंजवाली ई-स्कूटर या 13 राज्यांत मिळणार; महाराष्ट्र आहे का?Simple One चा थेट मुकाबला Ola Electric स्कूटरशी होणार आहे. जेवढी माहिती मिळालीय त्यानुसार सिंपल वन स्कूटर भारतातील सर्वाधिक रेंजची स्कूटर आहे. ती देखील जवळपास दुप्पट रेंजने पुढे आहे. सिंपल वन एका चार्जमध्ये 240 किमी धावू शकते. यामुळे ही स्कूटर शहरे, गावांमध्ये देखील उपयुक्त ठरणार आहे. 

Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्जSimple One Electric Scooter मध्ये 4.8 kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. मोठा बॅकअप असल्याने हिला वारंवार चार्ज करण्याची गरज भासणार नाही. इके मोडवर ही स्कूटर 240 किमी चालविता येते. ही रेंज तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा ओव्हरलोडिंग न करता व कमी वेगाने चालविली तर. असे केले नाही तर रेंज कमी मिळणार आहे. ही स्कूटर 3.6 सेकंदांत 50 किमी प्रति तासाचा वेग पकडते. याची टॉप स्पीड 100 किमी प्रति तास असेल. 

Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...या स्कूटरची किंमत 1 ते 1.20 लाख रुपयांच्या आसपास असेल. सबसिडीमुळे ती आणखी कमी होईल. ही स्कूटर  1,947 रुपयांत बुक करता येणार आहे. सिंपल वन इलेक्ट्रीक स्कूटर 15 ऑगस्टला लाँच होणार आहे. याच दिवशीपासून बुकिंग सुरु होणार आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर तब्बल 240 किमीची रेंज देते असा दावा कंपनीने केला आहे. Simple Energy (सिंपल एनर्जी) ही स्कूटर 2021 च्या पहिल्या सहामाहिमध्ये ही स्कूटर लाँच करणार होती. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हे लाँचिंग टाळण्यात आले. सुरुवातीला जरी ओला स्कूटरची रेंज 240 किमी सांगण्यात येत असली तरीदेखील  मीडिया रिपोर्टनुसार ओलाची स्कूटर 150 किमीची रेंज देण्याची शक्यता आहे. त्यापेक्षा 90 किमी जास्तची रेंज सिंपल वनची स्कूटर देते. 

१३ राज्यांमध्ये मिळणार...Simple One ही ई स्कूटर दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये विकली जाणार आहे. या राज्यांच्या शहरात एक्सपिरिअन्स सेंटर साठी जागा निवडण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर ही शहरे असण्याची शक्यता आहे. (The Simple Energy electric scooter will be up for pre-booking on India’s 75th Independence Day, with the reservation amount set at Rs 1,947.)

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड