शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

Ola-Ather चिंतेत, लॉन्च झाली 181 Km रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 22:05 IST

भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे.

EV Scooter : भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. सिंपल एनर्जी (Simple Energy) ही या विभागातील एक महत्त्वाची कंपनी म्हणून उदयास आली आहे. कंपनीने  OneS नावाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करून आपला पोर्टफोलिओत वाढ केली आहे. ही 1,39,999 रुपयांची स्कूटर 181 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. सध्या बंगळुरू, गोवा, पुणे, विजयवाडा, हैदराबाद, वायझाग, कोची आणि मंगलोर येथील शोरूममध्ये ही OneS उपलब्ध असेल.

या नवीन स्कूटरचे डिझाइन यापूर्वीच्या सिंपल वन सारखेच आहे. यामध्ये कोनीय हेडलाइट्स, शार्प बॉडी पॅनेल्स आणि हाय टेललाईटसह उतार असलेली सीट मिळते. याची एकूणच स्पोर्टी डिझाईन याला आणखी आकर्षक आणि डायनॅमिक लुक देते. कंपनीने या OneS स्कूटरला चार रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे. यात ब्रॅझन ब्लॅक, ग्रेस व्हाइट, अझूर ब्लू आणि नम्मा रेडचा समावेश आहे.

टचस्क्रीन डॅशबोर्ड आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीस्कूटरच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, सिंपल वनमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन डॅशबोर्ड आहे, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. तसेच, यात कस्टमाइझ करण्यायोग्य थीम, ॲप इंटिग्रेशन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि ओव्हर-द-एअर अपडेट मिळते. स्कूटरमध्ये 5-जी सिम देखील आहे, जे वायफायद्वारे इंटरनेटशी कनेक्ट होऊ शकते.

सेफ्टी फिचर्ससिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, यात फाइंड माय व्हेईकल, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रीजनरेटिव्ह आणि रॅपिड ब्रेकिंग सिस्टीम आणि नवीन पार्क असिस्ट फंक्शन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड अशा दोन्ही सुविधा आहेत. 

रेंज आणि बॅटरीOneS मध्ये 3.7kWh फिक्स्ड बॅटरी पॅक आहे, जो एका चार्जवर 181 किलोमीटरची रेंज देऊ शकतो. सध्याच्या डॉट वनपेक्षा हे 21 किलोमीटर जास्त आहे. स्कूटरमध्ये 8.5kW ची इलेक्ट्रिक मोटर आहे. याशिवाय उत्तम अनुभवासाठी चार राइड मोड आहेत, ज्यात इको, राइड, डॅश आणि सोनिकचा समावेश आहे. OneS 105 kmph चा टॉप स्पीड पकडू शकते.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन