शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

पेट्रोलपंपावरच्या बेतालपणालाही आता आवर घालण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 11:55 AM

गेल्या आठड्यात फेसबुकवर एक गंमतशीर व्हिडियो पाहायला मिळाला. पेट्रोलपंपावर एक कार येते. पंपाजवळ कार अशा पद्धतीने उभी करते की पंपातून पेट्रोलचा पाईप काही कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचत नाही.

ठळक मुद्दे पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करू नये असेही लिहिलिले असतेमोबाईल तर हल्ली पुढे लावलेला असतो. तो चालू असतो. तो बंदही कोणी करीत नाहीत यावर कारवाई काही नाही व कोण करणार हा प्रश्नच आहे

गेल्या आठड्यात फेसबुकवर एक गंमतशीर व्हिडियो पाहायला मिळाला. पेट्रोलपंपावर एक कार येते. पंपाजवळ कार अशा पद्धतीने उभी करते की पंपातून पेट्रोलचा पाईप काही कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत पोहोचत नाही. कारमधून एक तरुणी खाली उतरते व पाईप सर्वप्रकारारे ओढून ताणून कारच्या पेट्रोल टाकीपर्यंत न्यायचा प्रयत्न करते पण पेट्रोल काही भरता येत नाही अखेरीस पेट्रोलची टाकी पाईपाजवळ आण्यासाठी चार लोकांच्या मदतीने कार चक्क एका बाजूला उलटी पाडते आणि पेट्रोल भरते. पेट्रोल भरण्यासाठी कार काही सरळमार्गाने थोडी पुढे आणत नाही. एक तर ती तरुणी मूर्ख म्हणता येईल किंवा हेकेखोर. पेट्रोल पंपावर कार किंवा वाहन पेट्रोल भरण्यासाठी नेल्यानंतर कसे वागावे, वाहन कसे लावावे, याची पद्धत अते. पेट्रोलपंपावर मोबाइलचा वापर करू नये असेही लिहिलिले असते, तेथे ज्वलनशील असे सिगरेट पेटवणे, उदबत्ती लावणे असेही मूर्खपणाचे धोकादायक कृत्य करू नये. पेट्रोल भरण्यासाठी ठरवलेल्या रांगेत यावे इत्यादी ...पण सारे काही माहिती असते. लिहिलेले वा सांकेतिक खुणांनी  स्पष्ट केलेले असतानाही अनेक जण अनेक बाबींचे उल्लंघन करीत असतात.मुंबईसारख्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलप्रमाणे काही पंपावर सीएनजीचीही सोय आहे. काही ठिकाणी सीएनजीचे स्वतंत्र पंपही आहेत. पण अनेकांना इतकी घाई असते की त्या ठिकाणी घुसून अन्य लोकांच्या सौजन्याचा फायदा घेण्याची फार आवड असते. मोबाईल तर हल्ली पुढे लावलेला असतो. तो चालू असतो. तो बंदही कोणी करीत नाहीत उलट एखादा फोन आला तर तो न घेता कट करण्याऐवजी बोलायला सुरुवात करणारे महाभागही आहेत. वाहन चालवणाऱ्या महिलांचाही त्यात समावेश आहे.काही मोटारींमध्ये उदबत्ती लावलेल्या स्थितीतही पंपावर ती उदबत्ती आधीच न विझवता कार घालणारे चक्रमही आहेत. मुळात अशा साध्या पण महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते वा बेफिकीर राहिले जाते ही चिंतेची बाब आहे. अशावेळी कोणी दुसरा वाहनचालक ओरडून सुनावतो तेव्हा ही माणसे सरळ येतात. मुंबईसारख्या शहरात काय किंवा अन्य कुठेही पेट्रोल वा डिझेल भरण्यासाठीजाताना असे वर्तन हे गैरवर्तन असते, विसरलोच म्हणून चालणारे नाही. शिक्षा करण्याची तरतूदही असले कदाचित पण दुर्घटना झालीच काही मोठी तर शिक्षा कसली व कोणाला भोगावी लागेल याचा विचार करणे गरजेचे आहे. इंधन भरण्यासाठी घुसणे हा दुचाकी चालवणाऱ्या नवीन पिढीतील अनेकांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखेच काहींना वाटते. अशा प्रकारचे पेट्रोलपंपावरचे वर्तन हे वर नमूद केलेल्या त्या व्हिडियोतील तरुणीच्या वर्तनापेक्षा काही वेगळे आहे असे म्हणवत नाही. मोबाईलचा वापर करू नये असे स्पष्ट सर्वत्र नमूद असतानाही कारचालक,, दुचाकी चालक पेट्रोलपंपावर काय व प्रत्यक्षात वाहन चालवतानाही तो मोबाईल कानाला लावून बोलत पेट्रोलपंपापर्यंत येतात. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता बंद करायला सांगितले की फार उद्धटपणाने वा आपण काही उपकार करत आहोत अशा थाटात मोबाईल बंद करतात. यावर कारवाई काही नाही व कोण करणार हा प्रश्नच आहे.यातही गंमत अशी की सज्ञान झाल्यावर वाहन चालवण्याचा परवाना मिळतो पण तेव्हा देखील या महत्त्वाच्या बाबी शिकवल्या जात नाहीत, आरटीओमध्येही विचारल्या जात नाहीत. अर्था सज्ञान म्हणून परवाना मिळण्याचे वय झाल्यानंतर या गोष्टी शिकवण्याच्या मुळीच असत नाहीत पण तशा चांगल्या सवयी स्वतःहून समजून शिकण्यासारख्या आहेत. सिग्नल पाहून रस्ता क्रॉस करणारा कुत्राही जाहिरातीमध्ये भाव खाऊन जातो. पण माणूस मात्र अजूनही त्याच्यासारखा शहाणा होत नाही, हेच त्यातून सिद्ध होत नाही का? पेट्रोलपंपावर कसे वागावे, कसे वर्तन करावे याचेही जर धडे देण्याची वेळ आली असेल तर मग मात्र वाहन चालवण्याची पात्रताव त्याबाबतचे निकष अजून कठोर करावी, अशीच मागणी करावी लागेल.

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपMobileमोबाइल