Maruti Grand Vitara Recall: मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 18:35 IST2023-01-24T18:35:29+5:302023-01-24T18:35:48+5:30
मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती.

Maruti Grand Vitara Recall: मारुतीवर दुसऱ्यांदा ग्रँड नामुष्की! 11,177 विटारा माघारी बोलविल्या; आता सीटबेल्ट फॉल्टी
मारुती सुझुकीने काही दिवसांपूर्वीच अल्टोपासून ते ग्रँड व्हिटारा कार माघारी बोलविल्या होत्या. या मॉडेल्सच्या एअरबॅगमध्ये समस्या होती. त्यास आठवडा उलटत नाही तोच ग्रँड व्हिटाराच्या 11,177 कार माघारी बोलविल्या आहेत. महत्वाचे म्हणजे ही कार पाच महिन्यांपूर्वीच लाँच करण्यात आली होती.
8 ऑगस्ट 2022 ते 15 नोव्हेंबर 2022 या काळात ज्या ग्रँड विटारा बनविण्यात आल्यात त्यांच्यामध्ये सीटबेल्टची समस्या आहे. मागील सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेट्समधील संभाव्य बिघाड निश्चित करण्यासाठी हा लॉट माघारी बोलविण्यात आल्याचे मारुतीने म्हटले आहे.
मागील सीट बेल्ट माउंटिंग ब्रॅकेटमध्ये काही समस्या आहे ज्यामुळे ते सैल होत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत ते योग्यरित्या काम करू शकत नाही. मारुती सुझुकी डीलरशिपद्वारे प्रभावित ग्रँड विटाराच्या मालकांशी संपर्क साधला जाणार आहे. लवकरात लवकर वाहनांची तपासणी करून ही समस्या दूर करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
या रिकॉलमध्ये समाविष्ट असलेल्या वाहनांच्या तपासणी आणि दुरुस्तीसाठी कंपनी कोणतेही शुल्क आकारणार नाही. डीलरशिपद्वारे वाहन मालकांशी फोन, संदेश किंवा ईमेलद्वारे संपर्क साधला जाईल. मागील आठवड्याच्या सुरुवातीला, कंपनीने Alto K10, Brezza, S-Presso, Eeco, Grand Vitara आणि Baleno सारख्या मॉडेलचे 17,362 युनिट्स परत मागवले होते.
नवीन ग्रँड विटारा पेट्रोल इंजिन तसेच हायब्रीड प्रकारात उपलब्ध आहे. माईल्ड-हायब्रिड प्रकार 19 ते 21 kmpl आणि स्ट्राँग हायब्रिड प्रकार 27.97kmpl पर्यंत मायलेज देते. सीएनजीवर ही कार 26.6km/kg चे मायलेज देते.