शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ११ वाजेपर्यंत कुठे किती झाले मतदान?
2
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा
3
महाराष्ट्राच्या संघर्षाच्या इतिहासात राज ठाकरेंचं नाव राहणार नाही; संजय राऊतांची जळजळीत टीका
4
हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू; परराष्ट्र मंत्र्यांसह राज्यपालांनीही गमावला जीव
5
PM Modi Share Market : ४ जूननंतर शेअर बाजार नव्या शिखरावर असेल, PM मोदींनी गुंतवणूकदारांना दिला अनोखा सल्ला
6
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
7
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
8
'ही मॅन'नेही बजावला मतदानाचा हक्क, ८८ वर्षीय धर्मेंद्र पोहोचले मतदान केंद्रावर; Video व्हायरल
9
नंदुरबारचा रहिवासी.. गुजरातमध्ये GST अधिकारी, साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; कुणीच केला नाही तपास
10
Som Pradosh 2024: नशिबाची साथ मिळत नसेल तर आज सोम प्रदोष व्रत करा,भाग्य बदलेल; वाचा व्रतविधी!
11
Nrusinha Jayanti 2024: २१ मे नृसिंह जयंती: भगवान विष्णुंच्या नृसिंह अवतारामागे दडलेले रहस्य जाणून घ्या!
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
13
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
14
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
15
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
17
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
18
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
19
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
20
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात

विभाजक नसणाऱ्या रस्त्यांवर ओव्हरटेक करताना अतिशय सावधान राहाणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 2:59 PM

ओव्हरटेक ही अतिशय महत्त्वाची कृती आहे. विशेष करून विभाजक रहीत रस्त्यावर ओव्हरटेक करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देओव्हरटेक करताना आपण ज्या वाहनाला ओव्हरटेक करणार आहोत, त्या वाहनाच्या चालकाला त्याची कल्पना द्यावीप्रत्यक्षात ओव्हरटेक करताना पुढील बाजूने कोणतेही वाहन येत नाही याची खात्री करावी

ओव्हरटेक करणे ही एक सहजसोपी कृती आहे, असे मानून काही वाहनचालक अतिशय बेदरकारपणे ते काम करीत असतात. यामुळे त्यांना व अन्य वाहनांनाही धोका असतो, त्यातून समोरच्या वा अन्य वाहनांच्या चालकांना अतिशय सावध होत वाहन नियंत्रित करावे लागते. भारतात विभाजक नसलेल्या रस्त्यांवर ओव्हरटेक करताना विशिष्ट पद्धतीने ओव्हरटेक करावी लागते. तसेच एक्स्प्रेस वे सारख्या विभाजक असलेल्या मार्गावरही ओव्हरटेक करताना काही वेगळी काळजी घेऊन ते काम करावे लागते. विभाजक नसलेल्या मार्गाची आज नव्या पिढीतील चालकांना फार माहिती आहे असे दिसत नाही. दोन्ही हे मार्ग वेगळ्या रचनेचे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. विभाजक नसलेल्या मार्गावर ओव्हरटेक करताना अनेक धोके लक्षात घ्यावे लागतात, ते न घेतल्यास अपघाताची अधिक शक्यता असते. विभाजक नसलेल्या या मार्गावर ओव्हरटेक कशी करावी, का करावी, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे पाहाण्यासारखे आहे. बहुतांशी रस्ते हे विभाजक नसलेले असल्याने या प्रकारच्या रस्त्यावर अधिक काळजीपूर्वक ओव्हरटेक करणे गरजेचे आहे.चारचाकी वाहने या रस्त्यावर आणण्यापूर्वी प्रथम आपल्या कारचे वा वाहनाचे बाहेरच्या अंगाला असलेले दोन्ही आरसे व्यवस्थित जुळवून घ्यावेत, मागील वाहनाचा अंदाज त्यात नीट येत आहे की, नाही ते पाहावे. त्याचप्रमाणे कारमध्ये आतील बाजूस आरसा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला कारच्या मधे व पुढील काचेला लागून बसवलेला असतो. तो आरसाही नीट जुळवून म्हणजे अॅडजेस्ट करून घ्यावा. ओव्हरटेक करताना आपण ज्या वाहनाला ओव्हरटेक करणार आहोत, त्या वाहनाच्या चालकाला त्याची कल्पना द्यावी, त्याला अप्पर डिप्पर लाईट मारून वा हॉर्न वाजवून ती कल्पना द्यावी. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात ओव्हरटेक करताना पुढील बाजूने कोणतेही वाहन येत नाही याची खात्री करीत व आपल्या मागे वाहन असेल तर ते पाहून व त्यानुसार त्या वाहनाला आपण ओव्हरटेक करणार असल्याने डाव्या बाजूला येत असल्याचा साईड इंडिकेटर द्यावा.पुढील वाहनाची गती लक्षात घेऊन मग त्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी आपले वाहन उजव्या घेत व मागील वाहनाला साईड इंडिकेटरने तसा संकेत देत व पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी आपली कार उजव्याबाजूला हळूवारपणे घेत, गतीवर नियंत्रण राखीत व समोरून वाहन येत नसल्याची खात्री करीत ओव्हरटेक करावी. त्यानंतर आपले वाहन ज्या वाहनाला ओव्हरटेक करीत आहे, त्या वाहनाच्या पुढे त्याच्या रांगेत आपण येत आहोत, यासाठी साइड इंडिकेटरचा (डाव्या बाजूचा) संकेत देत आपल्या वाहनाची गती ओव्हरटेक ज्या वाहनाला करणार आहोत, त्यापेक्षा जास्त असली पाहिजे, हे भान राखीत आपल्या कारच्या वा वाहनाच्या डाव्या अंगाला असलेल्या आरशात ओव्हरटेक केलेल्या वाहनाचा व त्याच्या गतीचा अंदाज घेत त्या वाहनाच्या पुढे त्या वाहनाच्या रांगेत हळूवारपणे यावे. मागील वाहनाला त्याची गती कमी न करता आपण आपला वेग त्यापेक्षा जास्त राखीत आपल्या दिशेच्या योग्य रांगेत यावे व त्यानंतर साईड इडिकेटर बंद करावा. सर्वसाधारणपमे ओव्हरटेक करताना ओव्हरटेक ज्या वाहनाला करणार आहोत, ते वाहन आपल्या आरशात पूर्णपणे दिसले पाहिजे, त्यानंतरच त्या वाहनाच्या पुढे आपल्या दिशेच्या रांगेत पुन्हा यावे. हे करीत असताना, समोरून येणारे वाहन वा वाहने यांचा अंदाज घ्यावा. उजव्या बाजूला जाताना रस्त्याच्या बाजूचा अंदाज घ्यावा तसेच ओव्हरटेक केल्यानंतर डाव्या बाजूला वाहन घेतानाही त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूचा अंदाज घ्यावा. आपण रस्ता सोडून वाहन नेत नाही ना, याची काळजी घ्यावी. आपल्या दिशेची असणारी रांग मोडून विनाकारण समोरून येणाऱ्या वाहनाच्या रांगेत आपली कार घसवू नये.

टॅग्स :Automobileवाहनcarकार