कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 04:14 PM2018-09-15T16:14:11+5:302018-09-15T16:16:20+5:30

कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात.

Rumors and some facts about the car | कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले?

कारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले?

googlenewsNext

कार किंवा मोटरसायकल घेतल्यानंतर मायलेज किती देते? असे प्रश्न विचारले जातात. अमक्याची कार एवढे देते, मग तुझी कमी कशी देते, असे प्रश्न विचारून भंडावून सोडतात. तसेच एसी वापरू नको, इंधन अवेळी भरू नको अशाप्रकारचे सल्लेही दिले जातात. या सल्ल्यांमागे काही अनुभव काही अफवाही असतात. चला पाहुया यापैकी काही तथ्य.

एसी लावल्याने कारचे मायलेज कमी होते...
एसी लावल्याने कार कमी मायलेज देते, असे सांगितले जाते. काही अंशी खरेही आहे. जर कमी वेग असेल आणि एसी चालू असेल तर कार कमी मायलेज देते. पण जर हायवेवर वेगात असाल आणि एसी बंद ठेवल्यास काचा अघडाव्या लागतात. यामुळे समोरून वेगात येणारी हवा आत शिरत उलट कारला विरोध करते. यामुळे वेगात असताना काचा बंद करून एसी लावल्यास उलट मालयेज वाढते. 

मॅन्युअल पेक्षा अॅटोमॅटीक जास्त इंधन जाळते
मॅन्युअल ट्रान्समिशनपेक्षा अॅटोमॅटीक कार जास्त इंधन जाळते, असे सांगितले जाते. काही अंशी खरेही आहे. अॅटोमॅटीक ट्रान्समिशनची कार सारखी गिअर बदलत असल्याने इंधन जास्त जाळते. तर मॅन्युअल ट्रान्समिशनची कार आपल्याला हवे तेव्हा गिअर बदलता येतात. यामुळे मायलेज चांगले देते. एका प्रसिद्ध कंपनीची पाच लाखांची कार मॅन्युअल पेट्रोलला 22 किमी पर्यंत मायलेज देते. तर तिच अॅटोमॅटीक कार 14 किमीचे मायलेज देते. मात्र, ट्रॅफिकच्या ठिकाणी अॅटोमॅटीक कारच फायद्याची ठरते. 

सकाळी किंवा रात्री उशिरा इंधन भरणे चांगले?
सकाळी किंवा रात्री उशिरा थंड हवामान असते. अशावेळी पेट्रोल, डिझेल थंड असते. मात्र, उष्णतेच्या दुपारच्या वेळात हेच इंधन काही प्रमाणात प्रसरण पावलेले असते. आकुंचन प्रसरण पावण्याच्या या प्रकाराला डेन्सिटीमध्ये (घनता) मोजतात. पेट्रोल पंपावर केबीनजवळ जाऊन पाहिल्यास तिथे एक बोर्ड लावलेला असतो. त्यावर ती नमूद केलेली असते.  इंधनाच्या टाक्या या जमिनीमध्ये असतात. यामुळे संध्याकाळनंतरही जमिन तापलेली असल्याने टाकीतील इंधन गरम असते. बऱ्याचदा पेट्रोल पंपावर इंधन घेऊन येणाऱ्या टँकरमध्येही घनता जुळत नाही. यामुळे पेट्रोल डेपोमध्ये जी घनता नोंदवलेली असते ती जुळे पर्यंत टँकर उभे करून ठेवतात. ही घनता पेट्रोल डेपोमधील तापमानावर अवलंबून असते. 

प्रिमिअम पेट्रोल जास्त ताकद देते?
पेट्रोल कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी दोन तीन रुपये जादा दर असलेले प्रिमिअम पेट्रोल आणले आहे. मात्र, ग्राहकांनी त्याकडे पाठ फिरविली आहे. सुरुवातीला नवीन प्रकार म्हणून वाहनचालकांनी हे पेट्रोल वापरले. मात्र, नंतर याचा काहीच फायदा दिसून येत नसल्याने पुन्हा साध्याच पेट्रोलकडे आपला मोर्चा वळवला. प्रिमिअम पेट्रोल साध्या पेट्रोलपेक्षा जास्त रिफाईन्ड नसते. मात्र, जास्त ज्वलनशील असते. यामुळे ज्या गाड्यांचे इंजिन उच्च कॉम्प्रेसन रेशोचे असते त्यांना ते फायद्याचे ठरते. अशा गाड्या या लक्झरी कार असतात. यामुळे साध्या कारमध्ये साधे पेट्रोल वापरल्यास काही समस्या येत नाही.
 

Web Title: Rumors and some facts about the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.