Royal Enfield will stop three bullets production from the country? what is the reason | Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार? कारण काय...
Royal Enfield देशातून या तीन बुलेट बंद करणार? कारण काय...

नवी दिल्ली : Royal Enfield च्या बुलेटनी भारतीय रस्त्यांवर राज्य केले आहे. आजही या धाकड बाईकची मागणी प्रचंड आहे. वर्ष वर्षभर बुलेटप्रेमी पैसे भरून डिलिव्हरीची वाट पाहत असतात. मात्र, याच रॉयल एनफिल्डवर तीन बाईक बंद करण्याची वेळ आली आहे. 


एचटी मिंटने दिलेल्या वृत्तानुसार रॉयल एनफिल्ड 500 सीसीच्या तीन बाईक बंद करण्याच्या विचारात आहे. यामध्ये Bullet 500, Classic 500 आणि Thunderbird 500 या मोटारसायकल आहेत. रॉयल एनफिल्डला सध्या बीएस ६ नुसार इंजिन बदलणे आणि मागणी कमी असल्याने समस्या भेडसावत आहे. यामुळे कंपनीच्या उत्पादन खर्चात वाढ होत आहे. 


भारतात 500 सीसीच्या मोटारसायकलला मागणी नसल्याने कंपनी 350 सीसीची मोटारसायकलच अपडेट करणार आहे. या इंजिन क्षमतेच्या बुलेटना मोठी मागणी आहे. तसेच सध्याची इंजिने बीएस ६ मानांकन पूर्ण करत नाहीत. 500 सीसीच्या मोटारसायकल या प्रामुख्याने परदेशांतील बाजारांसाठी बनविण्यात आल्या होत्या. भारतात 2009 मध्ये कंपनीने नवीन हलके इंजिन वापरल्याने मागणी वाढली होती. मात्र, आता पुन्हा मागणी घटली आहे. 


याबाबत कंपनीने अद्याप दुजोरा दिलेला नसला तरीही त्यांनी अन्य बाईकसारखीच या बाईकलाही बदल मिळतील. यासाठी कमी वेळ उरला असल्याचे सांगितले. 

Web Title: Royal Enfield will stop three bullets production from the country? what is the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.