शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटमध्ये येणार Royal Enfield चे तुफान; 2022 मध्ये लाँच होणार 4 नवीन बाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 12:37 IST

Royal Enfield : कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नावे ट्रेडमार्क केली आहेत आणि रॉयल एनफिल्ड ही नावे आपल्या आगामी बाईक्ससाठी वापरणार आहे.

नवी दिल्ली :  रॉयल एनफिल्डची  (Royal Enfield) भारतात एकतर्फी बाजारपेठ बनली आहे आणि नवीन वर्षात कंपनी हे वातावरण आणखी गरम करणार आहे. 2022 साठी रॉयल एनफिल्डकडे अनेक नवीन उत्पादने आहेत, जी ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्याची योजना आखण्यात आली आहेत.

कंपनी भारतात 4 नवीन बाईक्स आणणार आहे, ज्यामध्ये नवीन जनरेशन रॉयल एनफिल्ड बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350), क्लासिक बॉबर 350 (Classic Bobber 350), हंटर 350 (Hunter 350) आणि  रॉयल एनफील्ड स्क्रीम 411  (Royal Enfield Scream 411) यांचा समावेश आहे. कंपनीने गेल्या काही दिवसांत अनेक नवीन नावे ट्रेडमार्क केली आहेत आणि रॉयल एनफिल्ड ही नावे आपल्या आगामी बाईक्ससाठी वापरणार आहे.

रॉयल एनफिल्ड हंटर 350चेन्नई स्थित बाईक निर्माता 2022 मध्ये हंटर 350 लाँच करण्यासाठी सज्ज आहे, या बाईकची नुकतीच चाचणी करण्यात आली आहे. लवकरच भारतात येणारी ही बाईक रॉयल एनफिल्ड मिटिओर 350 च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल, परंतु तिचे स्टाइल आणि डिझाइन पूर्णपणे वेगळे असणार आहे. मात्र, नवीन बाईकला ट्रीपर नेव्हिगेशन मिळेल जे मिटिओरसह प्रदान केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

रॉयल एनफिल्ड बुलेट 350रॉयल एनफिल्ड या वर्षी देशात नवीन जनरेशन बुलेट 350 लाँच करणार आहे आणि ही बाईक नवीन क्लासिक 350 प्रमाणेच प्लॅटफॉर्मवर तयार केली जात आहे. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन जनरेशनच्या बाईक्सची स्टाईल आणि डिझाइनमध्ये लक्षणीय बदल केले जातील. बाईकमध्ये तांत्रिक सुधारणाही होण्याची शक्यता आहे. नवीन बुलेट 350 मध्ये नवीन 350 cc इंजिन मिळेल जे 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm पीक टॉर्क बनवते. या बाईकला ट्रिपर नेव्हिगेशन देखील मिळणार आहे.

रॉयल एनफिल्ड हिमालयन (Scram 411)कंपनी 2022 मध्ये हिमालयनचे नवीन मॉडेल लॉन्च करेल, जे भारतीय बाजारपेठेत ऑफ-रोडरपेक्षा वेगळ्या रस्त्यावर धावण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. नवीन बाईकचे नाव Royal Enfield Scram 411 असू शकते, जी हिमालयन आधारित स्क्रॅम्बलर मोटरसायकल आहे. कंपनी या बाईकसोबत सिंगल-पॉड इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि ट्रिपर नेव्हिगेशन देखील देणार आहे.

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 बॉबररॉयल एनफिल्डच्या नवीन क्लासिक 350 वर आधारित आगामी बॉबर बाईक देखील 2022 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. बाइकला बॉबर स्टाईल देण्यासाठी त्याच प्रकारचे हँडलबार आणि बॉबर सीट सोबत देण्यात येणार आहे. हंटरप्रमाणेच, नवीन मोटरसायकलमध्ये मिटिओर 350 चे इंजिन मिळू शकते. कंपनी या नवीन बाईकद्वारे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांचे लक्ष वेधून घेऊ शकते.

टॅग्स :Royal Enfieldरॉयल एनफिल्डAutomobileवाहन