शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

Review: टाटाची स्वस्तातली 'रेंज रोव्हर' खरंच साजेशी आहे का? वाचा TATA Harrier कशी आहे...

By हेमंत बावकर | Updated: November 13, 2019 18:18 IST

लोकमतच्या टीमला जवळपास 1500 किमी एवढ्या मोठ्या अंतरावर ही एसयुव्ही चालविण्यास मिळाली. खड्ड्यांचे रस्ते, चढ उतार, ऑफरोड ड्रायव्हिंग, मायलेज, पिकअप अशा अनेक बाबींवर या हॅरिअरची चाचपणी करण्यात आली. #tataHarrier #review

- हेमंत बावकर मुंबई : भारतीय ग्राहक आता एसयुव्ही गाड्यांकडे वळू लागले आहेत. सेदाननंतर क्रॉसओव्हर वापरणारे आता हळूहळू नवनव्या एसयुव्हींकडे वळू लागले. टाटा मोटर्सने नेक्सॉननंतर अशा वाहन प्रेमींसाठी एसयुव्ही हॅरिअर उपलब्ध केली आहे. लोकमतच्या टीमला जवळपास 1500 किमी एवढ्या मोठ्या अंतरावर ही एसयुव्ही चालविण्यास मिळाली. खड्ड्यांचे रस्ते, चढ उतार, ऑफरोड ड्रायव्हिंग, मायलेज, पिकअप अशा अनेक बाबींवर या हॅरिअरची चाचपणी करण्यात आली. भारतीय कंपनी असलेल्या टाटाला खरेच भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीचे भान आहे की नुसताच रेंज रोव्हरचा प्लॅटफॉर्म वापरला? वाचा टाटाची हॅरिअर कशी वाटली.

टाटा हॅरिअरची बिल्ड क्वालिटी उत्तम आहे. स्टील त्यांच्याच कंपनीचे असल्याने यामध्ये तडजोड झालेली नाही. टाटाची पॅरेंट कंपनी रेंज रोव्हरच्या कारचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. 2000 सीसीचे इंजिन कार वजनी असूनही पुरेशी ताकद प्रदान करते. सहा स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मात्र, कार दुसऱ्या गिअरवर पिकअप घेताना अनेकदा अडखळली. स्पीडब्रेकरवरही कार बंद पडत होती. यामुळे शहरात आणि वाहतूक कोडींच्यावेळी कारला प्रामुख्याने पहिल्या गिअरमध्येच ठेवावे लागत होते. रस्त्यांप्रमाणे ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत. खड्डे, शहरी आणि ओला रस्ता अशा वेगवेगळ्या परिस्थितीत हे मोड वापरता येतात. यापैकी शहरी आणि खड्ड्यांचा मोडच वापरता आला. खड्ड्यांच्या मोडवेळी कारचे इंजिन ट्यून होत होते. तसेच सस्पेंन्शनही काहीसे स्मूथ जाणवत होते. मुंबई ते कणकवली असा प्रवास फोंडाघाट मार्गे करण्यात आला. या मार्गावर खड्डे मोठ्या प्रमाणावर होते. तेवढे धक्के आतमध्ये जाणवत नव्हते.

कारमध्ये चांगली स्पेस देण्यात आली आहे. पुढील आणि मागील दरवाजांमध्ये बॉटल होल्डरसह मोबाईल किंवा अन्य वस्तू ठेवण्यास जागा चांगली देण्यात आली आहे. लगेज स्पेसही खूप मोठी (425 लीटर) आहे. पाच जण या कारमध्ये आरामात बसू शकतात. लेदर सीटमुळे प्रवास आरामदायी वाटतो. मागच्या सीटच्या आर्मरेस्टवर ग्लास होल्डरही आहेत.  कमी उंचीच्या चालकांसाठी गिअरची जागा आणि आर्मरेस्ट अस्वस्थ करतात. युएसबी चार्जिंग पॉईंटही गिअरच्या पुढे डॅशबोर्डच्या आतमध्ये देण्यात आला आहे. पाठीमागेही चार्जिंग पॉईंट दिलेला आहे. महत्वाची बाब म्हणजे पाठीमागचा एसी व्हेंट दरवाजाच्या पीलरवर देण्यात आला आहे. 

आतून हॅरिअरची डिझाईन रेंज रोव्हरचा फिल देते. मटेरिअलही उत्तम प्रतीचे वापरण्यात आले आहे. 8.8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटोही आहे. साऊंड सिस्टीम चांगली जेबीएलची देण्यात आलेली आहे. स्टिअरिंगवर सर्व कंट्रोल आहेत. इन्स्ट्रूमेंट क्लस्टर डिजिटल आहे. त्यावर 80 किमी आणि 120 किमीवर वेगाची सूचना वेळोवेळी देण्यात येते. ही एक सुरक्षेची चांगली बाब आहे. गिअरचा नंबर, मोड, वेग, इंधन संपण्याचे अंतर, ट्रीप मीटर असे सर्व ओडोमीटरवर दिसते. 

सुरक्षेसाठी सहा एअरबॅग दिल्या आहेत. वळणावर खड्डे चुकविताना ही एसयुव्ही लगेचच नियंत्रणात येते. एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलीटी प्रोग्राम चांगल्या प्रकारे काम करतो. चढणीला थांबल्यानंतर पिकअप घेतेवेळी कार मागे जाताना जाणवली नाही. इंजिनाने चढण ओळखून पुढे जाण्याची ताकद दिली. 

चांगले काय? भारतीय रस्त्यांसाठीचा दणकटपणा पुरेपूर भरलेला आहे. वळणावरील आणि अचानक ब्रेकिंगचा कंट्रोल उत्तम. खड्डे, चढ उताराच्या रस्त्यांसाठी रेंज रोव्हरचेच गुणधर्म. हेडलाईट एलईडी आणि हॅलोजन दोन्ही प्रकारात असल्याने धूर, धुके, पावसात रात्रीच्यावेळी दृष्यमानता चांगली आहे. शिवाय फॉगलँम्पही आहे. केवळ एलईडी लाईट असती तर खूप त्रास होतो. पिकअप चांगला. मायलेज 13.5 ते 14.5 किमी प्रती लीटर जे एसयुव्हीसाठी खूपच चांगले म्हणावे लागेल. 50 लीटरची इंजिनची टाकी आहे. एकदा टाकी फूल केल्यावर संमिश्र असे 650 किमीचे अंतर कापले. 

 

कमी काय? साईड मिरर आणि सी पिलर आड आल्याने चालकाला उजव्या बाजुला दृष्यमानता शून्य होते. विशेषत: उजव्या वळणावर समस्या जाणवते. हॉर्न वाजविणे सावधपणाचे. अँड्रॉईड ऑटोवर मॅप लावल्यास काही वेळातच डिस्कनेक्ट होत होता. कदाचित युएसबी पॉईंट लूज असेल. 

 

वेगळेपण काय? टाटा हॅरिअरमध्ये विमानामध्ये वापरतात असा हँड ब्रेक दिला आहे. पूर्णपणे ओढल्यास रिलिज करताना अडकण्याची शक्यता आहे. दरवाजा जड असल्याने उंच सखल भागात उघडताना थोडी जास्त ताकद लावावी लागते. दरवाजाच्या वजनावरूनच हॅरिअरच्या दणकटपणाचा अंदाज येतो. महत्वाचे म्हणजे रेंज रोव्हर या जागतिक ख्यातीच्या एसयुव्हींचा प्लॅटफॉर्म वापरण्यात आला आहे. 45 लाखांच्या कारची मजबूती टाटा हॅरिअरमध्ये 15 लाखांपासून मिळते ही देखील एक जमेची बाजू आहे. 

 

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन