शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
4
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
5
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
6
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
7
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

Review: कशी आहे नवीकोरी 2017 Maruti Suzuki S Cross?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 7:57 PM

2017 Maruti Suzuki S Crossला गेल्या वर्षी नव्या रुपात लाँच करण्यात आलं होतं. खरं तर हे फेसलिफ्ट मॉडल छोट्या-मोठ्या सुधारणांसह बाजारात उतरवण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज'नं आठवडाभर Maruti Suzuki S Cross वापरून पाहिली. कारमधील वैशिष्ट्यं आणि उणिवा जाणून घेतल्या. आधीच्या माॅडेलपेक्षा ही कार चांगली आहे का, हे तपासून पाहिलं.

नवी दिल्ली- भारतीयांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलेल्या मारुती सुझुकी या कंपनीने एक नवीकोरी, चकाचक आणि टकाटक कार बाजारात आणली आहे. भारतीय ग्राहकांचा विचार करून ही कार डिझाइन करण्यात आली असून काही खास फीचर या कारमध्ये देण्यात आली आहेत. बाजारात दबदबा असलेल्या मारुती सुझुकीची ही कारही लोकप्रियतेचा नवा उच्चांक प्रस्थापित करू शकते.कॉम्पॅक्ट, हॅचबॅक, सेडान आणि कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकाराव्यतिरिक्त क्रॉसओव्हर गाड्यांमध्येही मारुती सुझुकीनं चांगली पकड मिळवली आहे. कंपनीनं क्रॉसओव्हर प्रकारात पहिल्यांदा 2015मध्ये पाऊल ठेवलं होतं. त्यावेळी मारुती सुझुकी एस क्रॉसकार कंपनीनं लाँच केली होती. परंतु ग्राहकांनी तिला फार पसंती दिली नव्हती. कालांतरानं क्रॉसओव्हर प्रकारात ग्राहकांची रुची वाढली. त्यानंतर मारुतीनं एस क्रॉसचं फेसलिफ्ट मॉडेल बाजारात उतरवलं. या फेसलिफ्ट मॉडेलनं कंपनीच्या जुन्या मॉडेलपेक्षा जास्त कमाई केली. 2017 Maruti Suzuki S Crossला गेल्या वर्षी नव्या रुपात लाँच करण्यात आलं होतं. खरं तर हे फेसलिफ्ट मॉडल छोट्या-मोठ्या सुधारणांसह बाजारात उतरवण्यात आलं आहे. 'लोकमत न्यूज'नं आठवडाभर Maruti Suzuki S Cross वापरून पाहिली. कारमधील वैशिष्ट्यं आणि उणिवा जाणून घेतल्या. आधीच्या माॅडेलपेक्षा ही कार चांगली आहे का, हे तपासून पाहिलं.2017 Maruti Suzuki S Crossमध्ये सर्वात मोठा बदल हा फ्रंट प्रोफाइलमध्ये करण्यात आला होता. ते पाहून कारला किती अपडेट केलं आहे हे लगेचच लक्षात येतं. कारला स्लेट क्रोम ग्रिल बसवण्यात आल्यामुळे कार आणखी बोल्ड आणि आकर्षक दिसते. यावेळी कारमध्ये प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डे-टाइम रनिंग लाइट, एलईडी फॉग लँप आणि स्पोर्टी बंपर बसवण्यात आला आहे.कारच्या फ्रंड प्रोफाइलमध्ये बदल केलेला असला तरी साइड प्रोफाइलमध्ये कोणताही बदल नाही. इथे तुम्हाला फक्त डायमंड कट एलॉय व्हील पाहायला मिळेल. त्यामुळेच गाडीच्या लूकला एक प्रकारची चकाकी येते. साइड प्रोफाइलसारखेच कारच्या मागच्या भागात कोणताही मोठा बदल केलेला नाही. तसेच कारचं इंटिरियर स्पेसही मस्त आहे. मारुती सुझुकीच्या गाड्या या आरामदायी कारचं आदर्श उदाहरण आहेत. ही कारही त्याला अपवाद नाही. कारमध्ये बसल्यावर तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं.कारमध्ये वापरण्यात आलेली प्लॅस्टिकची क्वालिटी खूपच चांगली आहे. डॅशबोर्डवर अनेक ठिकाणी क्रोमचा वापर करण्यात आला आहे. कारमधील इन्स्ट्रुमेंट क्लस्टरला NEXAच्या स्वाक्षरीसह ब्लू कलर टोनमध्ये ठेवण्यात आलं आहे. कारची ड्रायव्हिंग पोझिशन कमांडिंग आहे. कोणत्याही उंच व्यक्तीला ही कार चालवण्यात कोणताही त्रास होणार नाही. कारमध्ये टिल्ट- टेलिस्कोपिक स्टिअरिंग आणि अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीटसुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला कार ड्राइव्ह करणं सोपं जाणार आहे.कारमध्ये गेल्या मॉडलसारखी इंफोटेनमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे. यावेळी कारमध्ये अॅपल कार प्लेसह अँड्रॉइड ऑटो फीचरही देण्यात आले आहेत. तसेच नेव्हिगेशन आणि ब्लू टुथ कनेक्टिव्हिटीची सुविधाही दिली आहे. कारमध्ये बसवण्यात आलेले स्पीकर उत्तम दर्जाचे आहेत. यावेळी कारमध्ये मागच्या मॉडेलहून अॅडव्हान्स Apple carplay सोबत अँड्रॉइड ऑटोचीही सुविधा देण्यात आली आहे. आसन व्यवस्थाही चांगली आहे.तसेच सीटचे कुशनिंगही आरामदायी आहे. रस्त्यावर ही गाडी चालवताना समाधान जाणवतं. कारमध्ये 353 लीटरचा बूट स्पेस देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात सामानही ठेवता येणार आहे. कारमध्ये स्टोरेजही दिलं आहे. Maruti Suzuki S Cross सर्व व्हेरिअंटमध्ये एबीएस, ड्युअल एअरबॅग्स आणि ISOFIX चाइल्ड माउंट सीटलाही सेफ्टी फीचर देण्यात आले आहे.या टेक्नॉलॉजीचा वापर Maruti Suzuki Ciaz आणि Maruti Suzuki Ertigaमध्येही करण्यात आला आहे. SHVS टेक्नोलॉजीमुळे फ्युअल एफिशियन्सीही वाढली आहे. Maruti Suzuki S Cross ही डिझेल इंजिनच्या पर्यायसह बाजारात उपलब्ध आहे. यात 1.3 लीटर, डीडीआयएस 200 डिझेल इंजिन बसवण्यात आलं आहे. हे इंजिन 89 बीएचपीच्या पॉवर आणि 200 एनएमचा टॉर्क देण्यात आला आहे.या इंजिनमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन बसवण्यात आला आहे. तसेच मारुती लवकरच याचं पेट्रोल आणि ऑटोमॅटिक व्हर्जन लाँच करणार असल्याचीही चर्चा आहे.कारचं इंजिन सुयोग्य पद्धतीनं टोन करण्यात आलं आहे. कंपनीनं यावेळी इंजिनच्या कामगिरीवरही लक्ष केंद्रित केलं आहे. 1800-1900 आरपीएमची इंजिन पॉवर देण्यात आली आहे. तसेच कारची स्पीड स्टॅबिलिटीसुद्धा चांगली आहे. 2017 Maruti Suzuki S Cross ही 4 व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. याची विक्री कंपनीची प्रीमियम डीलरशिप नेक्साच्या माध्यमातून केली जाते.2017 Maruti Suzuki S Crossची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 8.61 लाखांपासून 11.32 लाखांपर्यंत आहे. या रिव्ह्यूमधून तुम्हाला आम्ही 2017 Maruti Suzuki S Crossच्या सर्व फीचरची माहिती दिली आहे. खरं तर नवी एस क्रॉस ही कार जुन्या एस क्रॉस कारच्या तुलनेत फारच चांगली आहे. त्यामुळे तुम्ही जर गाडी घेणार असाल तर तुमच्यासाठी 2017 Maruti Suzuki S Cross हा चांगला पर्याय आहे.

टॅग्स :AutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग