शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

१ एप्रिल २०२२ पासून 'या' गाड्या निघणार भंगारात; लवकरच येणार नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2021 13:44 IST

Scrapping Policy : १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनं वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची करण्यात आली होती घोषणा

ठळक मुद्दे वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची यापूर्वी करण्यात आली होती घोषणा१५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणीचं नुतनीकरण होणार नाही

देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या १५ वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याच्या स्क्रॅपेज धोकणाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी मंजुरी दिली होती. आता १ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभागांना आपल्या १५ वर्षांपेक्षा जुन्या गाड्यांची नोंदणीचं नुतनीकरण करता येणार नाही. केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या प्रस्तावाला अंतिम रूप दिलं तर हा नियम लागू होणार आहे. मंत्रालयाकडून या संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटिफिकेशन जारी करून यावरील सूचना मागवण्यात आल्या आहेत.प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर सर्व सरकारी वाहनं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगर पालिका आणि स्वायत्त संस्थांना लागू होणार आहे. "१ एप्रिल २०२२ पासून सरकारी विभाग आपल्या १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नुतनीकरण करू शकणार नाही. हे नियम केंद्र सरकार, राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उपक्रम, नगर पालिका आणि स्वायत्त संस्थांना लागू होणार आहे," असं ट्वीट राष्ट्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्रायलाद्वारे करण्यात आलं आहे.  अर्थसंकल्पातच घोषणाअधिसूचनेद्वारे ड्राफ्ट नियम १२ मार्च रोजी जारी करण्यात आले आहेत. यावर ३० दिवसांच्या आत सूचना, काही हरकती देण्यासही सांगण्यात आलं आहे. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२१ रोजी सरकारनं वॉलेंटरी व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा केली होती. या अंतर्गत खासगी वाहनांना २० वर्षांनंतर आणि कमर्शिअल वाहनांना १५ वर्षांनंतर फिटनेस चाचणी करणं आवश्यक केलं होतं. "सुरूवातीला १ कोटी वाहनं स्क्रॅपिंगसाठी दिली जाणार आहे. या धोरणात जवळपास १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक आणि जवळपास ५० हजार नोकऱ्या तयार होतील. या गाड्या नव्या गाड्यांच्या तुलनेत१० ते १२ टक्के अधिक प्रदुषण करतात," असं गडकरी यापूर्वी म्हणाले होते.यासाठीचे पहिले पाऊल केंद्र सरकारने २६ जुलै २०१९ लाच उचलले होते. देशात इलेक्ट्रीक वाहनांना बूस्ट देण्यासाठी १५ वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात काढण्यास मंजुरी देण्यासाठी मोटर वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला होता. आता त्यावर हळू हळू अंमल करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :carकारIndiaभारतGovernmentसरकारNitin Gadkariनितीन गडकरीpollutionप्रदूषण