मुंबई: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये सध्या एसयूव्ही गाड्यांची मोठी क्रेझ आहे. फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनो भारतात एकेकाळी पसंतीस उतरलेली डस्टर पुन्हा लाँच करणार आहे. अशातच रेनोची सर्वात प्रीमियम आणि फ्लॅगशिप कार 'रेनो राफेल' भारतीय रस्त्यांवर दिसल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नुकतीच ही कार भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान स्पॉट झाली असून, तिच्या पहिल्या झलकाने कारप्रेमींची उत्सुकता वाढवली आहे. रेनो राफेल ही एक प्रीमियम 'कुपे स्टाईल' एसयूव्ही आहे. तिची डिझाइन अत्यंत स्पोर्टी आणि आधुनिक आहे. या कारचे नाव १९३० च्या दशकातील एका प्रसिद्ध विमानावरून ठेवण्यात आले आहे, जे या कारच्या वेगवान आणि एरोडायनॅमिक लूकला साजेसे आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ही कार 'हायब्रिड' इंजिनसह उपलब्ध आहे. यात १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते दोन इलेक्ट्रिक मोटर्सशी जोडलेले आहे. ही यंत्रणा २०० एचपी (HP) पर्यंत पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. कुपे असले तरीही या कारमध्ये 647 लीटरचे बुट स्पेस देण्यात आलेली आहे.
तुमच्या माहितीसाठी ही कार भारतात येण्याची शक्यता आतातरी दिसत नाहीय. जी कार दिसली ती कार भारतीय नंबरने रजिस्टर झालेली होती. म्हणजेच ही कार इम्पोर्टेड आहे आणि रेनोने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी ती भारतात आणलेली असावी, असे कयास लावले जात आहेत.
इंटीरियर आणि फीचर्स:
प्रीमियम डॅशबोर्ड: यात रेनोचे आधुनिक 'OpenR' डिजिटल कॉकपिट पाहायला मिळू शकते.
मोठी टचस्क्रीन: १२.३ इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १२ इंचाचा वर्टिकल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम.
सेफ्टी: यात अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) आणि अनेक आधुनिक सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.
Web Summary : Renault Rafale, a premium coupe SUV, spotted testing in India, sparking excitement. Though unlikely for launch, the imported car, possibly for Renault officials, boasts hybrid engine and modern features.
Web Summary : रेनो राफेल, एक प्रीमियम कूप एसयूवी, भारत में टेस्टिंग के दौरान दिखी, जिससे उत्साह बढ़ गया। लॉन्च की संभावना नहीं, लेकिन आयातित कार, संभवतः रेनो अधिकारियों के लिए, हाइब्रिड इंजन और आधुनिक सुविधाओं से लैस है।