ह्युंदाई, एमजी, टाटाला हरविणार; Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही आणणार, 450 किमीची रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 07:28 PM2021-05-24T19:28:41+5:302021-05-24T19:36:47+5:30

Renault SUV Megane-e: कंपनीने या कारचे प्रॉडक्शन मॉडेल दाखविले आहे. यामुळे ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र ही कार अद्याप कुठेही टेस्टिंग करताना दिसलेली नाही.

Renault Megane E-Tech teased; will range of 450 km on single charge | ह्युंदाई, एमजी, टाटाला हरविणार; Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही आणणार, 450 किमीची रेंज

ह्युंदाई, एमजी, टाटाला हरविणार; Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही आणणार, 450 किमीची रेंज

Next

भारतात ह्युंदाई, एमजी, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांनी भारतीय बाजारात आधीच इलेक्ट्रीक कार लाँच केल्या आहेत. आता या यादीत एक अशी ईव्ही येत आहे, की ती कार या साऱ्यांना हरविणार आहे. Renault लवकरच ईव्ही एसयुव्ही Megane-e SUV लाँच करणार आहे. नुकतीच कंपनीने या अपकमिंग कारची झलक दाखविली आहे. भारतातही ही कार लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. (Renault have teased its upcoming all-new Megane E-Tech electric SUV ahead of its full reveal later this year.)


कंपनीने या कारचे प्रॉडक्शन मॉडेल दाखविले आहे. यामुळे ही कार लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. मात्र ही कार अद्याप कुठेही टेस्टिंग करताना दिसलेली नाही. SUV Megane-e ही एक पूर्णपणे इलेक्ट्रीक कार आहे. या कारचे डिझाईन नुकतीच लाँच झालेल्य़ा Renault Kiger सारखी आहे. 

कंपनीकडून जारी झालेल्या या टीझर इमेजमध्ये कारचे नाव आणि तिची टेल लाईट दाखविण्यात आली आहे. बॅजिंगमध्ये E ला गोल्डन अक्षरामध्ये लिहिण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे यामध्ये Renault चा लोगोदेखील दाखविण्यात आला आहे. यामध्ये एलईडी लाईट स्टि्रप्स देण्यात आली आहे. 
कारमधील इंटेरिअरमध्ये एल आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. डिजिटल इन्स्ट्रूमेंट आणि सेंटर कंसोलमधील गॅप भरते. Megane-e ही कंपनीची पहिली कार असेल ज्यामध्ये नवीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात येईल जी गुगल सर्व्हिसेसवर आधारित आहे. 


ताकद आणि रेंज
Megane-e मध्ये जी इलेक्ट्रीक मोटर 217 hp ताकद आणि 300 Nm चा पीक टॉर्क देते. कंपनीच्या दाव्य़ानुसार ही कार 0 ते 100 किमी प्रति तास वेगाचे अंतर 8 सेकंदात पकडतेय तसेच 60 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सिंगल चार्जवर ही कार 450 किमीची रेंज देते.

Web Title: Renault Megane E-Tech teased; will range of 450 km on single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.