Range Rover Evoqueची नवी एसयुव्ही लाँच; किंमत 54.94 लाखांपासून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 16:14 IST2020-01-30T16:12:13+5:302020-01-30T16:14:06+5:30
एसयुव्ही पेट्रोल आणि डिझेलमध्ये लाँच केली आहे.

Range Rover Evoqueची नवी एसयुव्ही लाँच; किंमत 54.94 लाखांपासून
मुंबई : Land Rover ने भारतीय बाजारात नवीन Range Rover Evoque आज लाँच केली. या कारची किंमत 54.94 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीने ही एसयुव्ही पेट्रोल आणि डिझेलमध्ये लाँच केली आहे.
तर D180 R-Dynamic SE कारची किंमत 59.85 लाख रुपये आहे. ही किंमत मागील कारपेक्षा 3.11 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कारच्या डिझेल मॉडेलची विक्री सुरू करण्यात येणार असून पेट्रोल मॉडेलची विक्री काही दिवसांनी सुरू करण्यात येणार आहे.
नव्या कारमध्ये JLR’s Ingenium line चे BS6 मानकाचे इंजिन देण्यात आले आहेत. 2.0 लीटरचे 4 सिलिंडरचे टर्बो डीझेल युनिट (D180) आहे. हे इंजिन 180hp ताकद आणि 430Nm टॅार्क निर्माण करते. तर पेट्रोल इंजिन 249hp ची ताकद आणि 48 व्होल्ट माईल्ड हायब्रिड सिस्टिम मिळते. ही गाडी ऑल व्हील ड्राईव्ह असून 9 स्पीड अॅटोमॅटीक गिअरबॉक्स मिळतो.
इव्होकमध्ये डीआरएलसोबत अॅटो एलईडी हेडलाईट्स, हीटेड विंग मिरर्स, टेलगेट, पॅनारोमिक सनरूफ, 18 इंचाचे अलॉय व्हील्स, 2 झोन अॅटोमॅटीक क्लायमेट कंट्रोल, पूश स्टार्ट बटन, 40:20:40 फोल्डेबल सीट, क्रूझ कंट्रोल आदी फिचर्स मिळतात. यासोबतच 10 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम मिळते. यामध्ये Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट मिळतो.