राहुल बजाज करणार कंपनीला 'अलविदा'; 50 वर्षांपूर्वी सांभाळली होती धुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 06:30 PM2020-01-30T18:30:58+5:302020-01-30T18:32:47+5:30

बोर्डने राहुल बजाज यांना एप्रिल 2015 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते.

Rahul Bajaj will resign from CEO post of bajaj auto; know why? | राहुल बजाज करणार कंपनीला 'अलविदा'; 50 वर्षांपूर्वी सांभाळली होती धुरा

राहुल बजाज करणार कंपनीला 'अलविदा'; 50 वर्षांपूर्वी सांभाळली होती धुरा

Next
ठळक मुद्देबजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी राहुल बजाज यांना नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून मंजुरी दिली आहेराहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रुपची जबाबदारी सांभाळली होती. कंपनीचा व्यवसाय 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर गेला होता.

नवी दिल्ली : बजाज ऑटोचे कार्यकारी अध्यक्ष राहुल बजाज पद सोडणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 31 मार्च 2020 ला संपणार असून रतना टाटांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहेत. म्हणजेच बजाज ग्रुपच्या कोणत्याही निर्णयामध्ये ते थेट सहभाग घेऊ शकणार नाहीत. गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी बजाजची धुरा सांभाळली होती. 


बजाज ऑटोने आज ही माहिती दिली आहे. बोर्डने त्यांना एप्रिल 2015 मध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा कार्यकाळ ५ वर्षांचा होता. कंपनीने सांगितले की, काही कारणांमुळे त्यांनी कंपनीचा संचालक म्हणून काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


बजाज ऑटोच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी राहुल बजाज यांना नॉन-एग्जीक्यूटिव डायरेक्टर म्हणून मंजुरी दिली आहे. त्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 पासून सुरू होणार आहे. सेबीच्या नियमांनुसार त्यांच्या नियुक्तीसाठी शेअर धारकांकडून पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे. 


राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रुपची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात कंपनीचा व्यवसाय 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर गेला होता. ही स्कूटर विकणारी आघाडीची कंपनी होती. 2005 मध्ये राहुल यांनी त्यांच्या मुलाकडे जबाबदाऱ्या देण्यास सुरूवात केली. राजीव बजाज यांना व्यवस्थापकीय संचालक बनविले होते. 

Web Title: Rahul Bajaj will resign from CEO post of bajaj auto; know why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.