price is the same as Swift, Renault kiger will launch today in 5 lakhs range | किंमत स्विफ्ट एवढी, पण मारुतीच्या ब्रेझाला देणार टक्कर; आज नवीन कॉम्पॅक्ट SUV येतेय

किंमत स्विफ्ट एवढी, पण मारुतीच्या ब्रेझाला देणार टक्कर; आज नवीन कॉम्पॅक्ट SUV येतेय

भारतात निस्सानने हॅचबॅकच्या किंमतीत कॉम्पॅक्ट एसयुव्ही लाँच करून एकच खळबळ उडवून दिली होती. Nissan Magnite ला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता याच मॅग्नाईटची सख्खी बहीण आज भारतीय बाजारात येणार आहे. निस्सान आणि रेनॉ या दोन्ही कंपन्या एकच आहेत, फक्त ब्रँड वेगवेगळे आहेत. निस्सानला भारतीय बाजारपेठेत उर्जितावस्थेत आणण्यासाठी मॅग्नाईटने मोठी भूमिका बजावली आहे. 


Renault Triber ही सात सीटर कार सर्वात स्वस्त कार म्हटले जात होते. मात्र, Nissan Magnite ने हा किताब काढून घेतला आहे. Renault Kiger ही ती कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. कारण या कारचीही किंमत 5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार या सेगमेंटमधील सर्वात छोटी असली तरीही मायक्रो किंवा मिनी एसयुव्ही म्हटले जाणार नाही. कारण या कारची साईज ४ मीटरपेक्षा छोटी असणार नाही.


Renault Kiger चे इंजिन हे निसान मॅग्नाईटसारखेच असणार आहे. जे 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.0 लीटर टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन असेल. हे इंजिन 72bhp ताकद आणि 96Nm टॉर्क तयार करते. तर टर्बोचार्ज इंजिन 99bhp ताकद आणि 160Nm टॉर्क तयार करेल. ही कार ५ स्पीड मॅन्युअल आणि सीव्हीटी अॅटोमॅटीक ट्रान्समिशनमध्ये येऊ शकते. 


रस्त्यावर येणाऱ्या Renault Kiger चे डिझाईन त्याच्या कॉन्सेप्ट कारसारखेच मिळतेजुळते आहे. रेनो ट्राइबरसारखेच ही कार CMFA+ platform वर असणार आहे. ८ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी हेडलँप, स्लिट हेडलँप, मल्टी फंक्शनल स्टीअरिंग व्हील, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आदी फिचर्स असणार आहेत.


रेनॉ किगरचा मुकाबला मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV300 आणि किया सोनेटशी असणार आहे. Kiger मध्ये स्प्लिट LED headlamps आणि LED DRLs आहेत. Kiger मध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात येणार आहे. तसेच सनरुफही असण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 5 ते 9.50 लाख एक्सशोरुम असण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: price is the same as Swift, Renault kiger will launch today in 5 lakhs range

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.