Porsche ची नवीन जनरेशनवाली कार Porsche 911 गेल्या वर्षी झालेल्या LA Auto Show मध्ये दाखविण्यात आली होती. आता ही स्पोर्ट कार भारतात लाँच केली जाणार आहे. 11 एप्रिलला या सुंदर कारचे लाँचिंग असणार आहे. 


या कारच्या परफॉर्मन्स आणि तंत्रज्ञानावर खूप काम केले गेले आहे. कोडनेम 992 असे ठेवण्यात आले असून या कारला दोन दरवाजे आहेत. यामध्ये आयकॉनिक silhouette पाहायला मिळणार आहे. जी 911 श्रेणीची ओळख आहे. या कारमध्ये ताकद देण्यासाठी 6 सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. 


Porsche 911 Carrera S आणि 911 Carrera 4S मध्ये 3.0 लीटर, फ्लॅट-6, टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 30 अश्वशक्ती ताकद प्रदान करते. या कारमध्ये 444 बीएचपी ची ताकद मिळणार आहे. ज्याद्वारे 0 ते 100 किमीचा वेग केवळ 4 सेकंदात पकडता येणार आहे. 
दोन्ही कारमध्ये हा फरक काही सेकंदांचा आहे. Carrera S चा सर्वाधिक वेग 3.8 किमी तर Carrera 4S चा वेग 306 किमी प्रती तास असणार आहे. 


ही कार नव्या जमान्याची असली तरीही अंतर्गत रचना ही 1970 च्या 911 मॉडेलपासून प्रेरित आहे. यामध्ये 10.9 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 


Porsche 911 ही कार आठवी पिढीतील आहे. मागील भागात अॅल्युमिनिअमचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे. याशिवाय कारचे वजन बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आले आहे.

Web Title: Porsche's beautiful car will soon be on Indian roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.