शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि  Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:06 IST

Poise Scooters Launched 2 Electric scooters : Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप्स भारतीय बाजारपेठेत त्यांची वाहने सतत लॉन्च करत आहेत, विशेषत: सध्या इलेक्ट्रिक दुचाकींचा ट्रेंड आहे. शानदार फीचर्स असलेली ही वाहने ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून दर महिन्याला वाहनांची विक्री अनेक पटींनी वाढत आहे. यापैकी एक Poise स्कूटर्स आहे. Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात. अशातच जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर एक उत्तम पर्याय असू शकते. 

सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंजPoise ने NX-120 आणि Poise Grace लाँच केले आहेत, ज्याची किंमत अनुक्रमे 1.24 लाख आणि 1.04 लाख रुपये आहे. या किमती एक्स-शोरूम कर्नाटकातील आहेत. कंपनीने दावा केला आहे की, Poise Grace आणि NX-120 सोबत बसवण्यात आलेली लिथियम-आयन बॅटरी सिंगल चार्जवर 110 किमी पर्यंतची रेंज देते. या स्कूटर्स कमाल 55 किमी/तास वेगाने चालवल्या जाऊ शकतात, जे कमी अंतर कापण्यासाठी योग्य आहे. या दोन स्कूटर्स व्यतिरिक्त, कंपनी आणखी अनेक प्रोडक्ट्सवर काम करत आहे, ज्यापैकी एक जुईंक हाय-स्पीड स्कूटरचा समावेश आहे.

यशवंतपूरमध्ये होतंय स्कूटर्सचे प्रोडक्शन  आगामी स्कूटरबद्दल कंपनीने अजून जास्त माहिती दिलेली नाही पण ती जास्तीत जास्त 90 किमी/तास वेगाने चालवली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या स्कूटर्सचे प्रोडक्शन बंगळुरूमधील यशवंतपूर येथे केले जात आहे, जे अतिशय अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम केले जात आहे. या प्लांटमध्ये वर्षाला 30,000 इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केले जाऊ शकते आणि मागणी वाढीनुसार ही उत्पादन क्षमता 1 लाख युनिटपर्यंत वाढवता येऊ शकते.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर