स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 12:10 IST2025-09-21T12:10:22+5:302025-09-21T12:10:58+5:30

सणासुदीच्या हंगामात नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे.

Opportunity to buy your dream SUV! Mahindra Scorpio gets cheaper by ₹2.15 lakh; Know the new price | स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत

सणासुदीच्या हंगामात नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी महिंद्राने त्यांच्या बेस्ट सेलिंग एसयूव्ही 'स्कॉर्पिओ एन'च्या किमतीत मोठी कपात केली आहे. जीएसटीच्या नियमांतील बदलांनंतर कंपनीने या गाडीच्या किंमतीत तब्बल ₹१.४५ लाख पर्यंतची घट केली आहे. या घोषणेमुळे ग्राहकांना दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी खरेदीची मोठी संधी मिळणार आहे.

बचतीची मोठी संधी! 
किंमतीतील कपातीबरोबरच, महिंद्राने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्कॉर्पिओ एनवर ₹७१,०००पर्यंतचे अतिरिक्त फायदे देखील दिले आहेत. याचाच अर्थ, ग्राहक आता एकूण ₹२.१५ लाखापर्यंतची बचत करू शकणार आहेत. या कपातीनंतर स्कॉर्पिओ एनच्या बेस मॉडेलची एक्स-शोरूम किंमत आता ₹१३.२० लाख झाली आहे.

दमदार फीचर्स आणि ५-स्टार सेफ्टी!
महिंद्रा स्कॉर्पिओ एन केवळ तिच्या दमदार इंजिनसाठीच नाही, तर तिच्या सेफ्टी फीचर्ससाठीही ओळखली जाते. या एसयूव्हीला ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यामध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल होल्ड, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम आणि रोलओव्हर मिटिगेशन यांसारखे प्रगत सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहेत.

गाडीच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात ८-इंचाची टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍप्पल कारप्ले, १२-स्पीकर सोनी म्युझिक सिस्टिम, इलेक्ट्रिक सनरूफ आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स मिळतात.

महिंद्रा स्कॉर्पिओ एन दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. २.०-लिटर पेट्रोल इंजिन-हे इंजिन २०१ bhpची पॉवर आणि ३७० Nmचा टॉर्क जनरेट करते. तर, २.२-लिटर डिझेल इंजिन- हे इंजिन १७५ bhpची पॉवर आणि ४०० Nmचा टॉर्क जनरेट करते.

Web Title: Opportunity to buy your dream SUV! Mahindra Scorpio gets cheaper by ₹2.15 lakh; Know the new price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.