Oppo Electric Car, Scooter: भारतात येतेय टाटा नॅनोसारखी स्वस्त इलेक्ट्रीक कार; ही प्रसिद्ध कंपनी तयारीला लागली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 16:05 IST2021-12-01T16:05:29+5:302021-12-01T16:05:39+5:30
Cheapest Electric Car, Scooter in India: भारतात सध्या चांगल्या स्कूटरची किंमत 1 लाखाच्या आसपास आहे. चीनची भारतातील मोठी कंपनी कमी निम्म्या किंमतीत स्कूटर आणून भारतीय बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न करणार आहे.

Oppo Electric Car, Scooter: भारतात येतेय टाटा नॅनोसारखी स्वस्त इलेक्ट्रीक कार; ही प्रसिद्ध कंपनी तयारीला लागली
सेल्फी कॅमेऱ्यासाठी प्रसिद्ध असलेली चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो (Oppo) भारतात इलेक्ट्रीक व्हेईकल आणण्याची तयारी करत आहे. सुरुवातीला ओप्पो भारतात स्वस्तातली स्कूटर आणणार आहे. या स्कूटरची किंमत 60000 रुपये असण्याची शक्यता आहे. तर यानंतर टाटाच्या नॅनोसारखी छोटी इलेक्ट्रीक कार आणणार आहे.
भारतात सध्या चांगल्या स्कूटरची किंमत 1 लाखाच्या आसपास आहे. यामुळे ओप्पो त्यापेक्षा निम्म्या किंमतीत स्कूटर आणून भारतीय बाजारपेठ काबिज करण्याचा प्रयत्न करणार आहे. ही दोनही उत्पादने 2023-24 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
बजेट इलेक्ट्रीक स्कूटरसोबत कंपनी कारदेखील आणणार आहे. ही कारदेखील स्वस्त असेल. मीडिया रिपोर्टनुसार ही टाटा नॅनोसारखी स्वस्त आणि कॉम्पॅक्ट कार असेल. टाटाची नॅनो कार फेल झाली असली तरी ओप्पोला मात्र मोठी आशा आहे. कारण ही कार इलेक्ट्रीक असणार आहे. नॅनोसारखीच छोटी इलेक्ट्रीक कार महिंद्राकडेही आहे.
ओप्पोसह वनप्लस, शाओमीसारख्या कंपन्यांचे नावही इलेक्ट्रीक वाहनांसाठी चर्चेत आहे. शाओमीचे स्मार्टफोन भारतीय बाजारात सर्वाधिक विकले जातात. या चिनी कंपनीने ‘Xiaomi EV’ नावाने नवीन इलेक्ट्रीक कार कंपनीचे रजिस्ट्रेशन केले आहे. शाओमी ही कंपनी चांगल्या फिचर्सची उत्पादने कमी किंमतीत आणते. यामुळे ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रातही खळबळ उडवून देण्याच्या तयारीत आहे. भारत या कंपनीला खुनावत आहे.
संबंधित बातम्या...
Revolt RV400 चा जोरदार दुहेरी झटका; किंमतीत मोठी वाढ, बॅटरीची वॉरंटीही केली कमी
Apache RTR 200 4V: टीव्हीएसची धांसू बाईक लाँच; ड्रायव्हिंगचे तीन मोड्स, जाणून घ्या किंमत