सायकल किती वेगाने धावू शकते? 20, 30, 50, 100 किमी प्रती तास...तुमचा विश्वास बसणार नाही, पण एका व्यक्तीने तब्बल 280 किमी प्रतीतास एवढ्या प्रचंड वेगाने सायकल चालवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. 


इंग्लंडच्या 45 वर्षांचा सायकलपटू नील कॅम्पबेल याने हा विक्रम केला आहे. नीलने 24 वर्षांपूर्वीचे डच सायकलपटूचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड बनविण्यासाठी नीलली महागड्या पोर्श्च कारसोबत पाठविण्यात आले होते. ही रेस नॉर्थ यॉर्कशायरच्या एलविंग्टन एयरफील्डवर घेण्यात आली होती. 


या रेसचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आला आहे. नीलने जी सायक वापरली होती, ती खास एवढ्या वेगासाठी तयार करण्यात आली होती. यासाठी 15 लाखांचा खर्च आला होता. 


वर्ल्ड रेकॉर्ड बनविल्यानंतर नीलने सांगितले की, आता मला स्वस्थ वाटू लागले आहे. आमच्या टीमने आश्चर्यकारकरित्या चांगली कामगिरी केली आहे. 


1995 मध्ये नेदरलँडच्या सायकलपटूने 268.76 किमीच्या वेगाने सायकल चालविली होती. हे रेकॉर्ड नीलने तोडले आहे.

Web Title: OMG...! British cyclist Neil Campbell smashes speed record with 280kmph speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.