शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:30 IST

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे.

नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehilce) वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. दिग्गज कंपन्यांपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक ब्रँड्स बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर विकत असले तरी, ओला (Ola) इलेक्ट्रिकने निर्माण केलेली लोकप्रियता ही सर्वात जास्त आहे. कॅब सेवेनंतर अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दाखल झालेल्या ओला इलेक्ट्रिकने एप्रिल महिन्यात 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. यासह, ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे.

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. त्यानुसार, कंपनीने एका महिन्यात तब्बल 30 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या यादीत ओलाने सलग आठव्यांदा पहिले स्थान मिळवले आहे. तसेच, इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील कंपनीची भागीदारी 40 टक्क्यांवर पोहोचल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा अर्थ टीव्हीएस, एथर एनर्जी, हिरो, बजाज, ओकिनावा आणि इतर ब्रँडच्या स्कूटर यांची एकूण भागीदारी 60 टक्के आहे. 

याचबरोबर, ओलाने विक्रीत 30 हजारांचा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यात कंपनीने 17 हजार युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच कंपनी महिन्याला 10 टक्के जास्त विक्री करत आहे. तसेच, ओला देशभरात आपले एक्सीपिरियन्स सेंटर्स वाढवत आहे. कंपनीचा दावा आहे की, ओलाचे 90 टक्के ग्राहक हे एक्सीपिरियन्स सेंटर्सच्या 20 किमी परिसरात राहणारे आहेत. 

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज?ओलाने इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro चा समावेश आहे. कंपनी ने बेस मॉडेल S1 Air ची किंमत 84,999 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर 101 किमीची रेंज देते. तर S1 मॉडेलसाठी 99,999 रुपये मोजावे लागत आहेत. या स्कूटरची रेंज 128 किमी आहे. याशिवाय, S1 Pro ची किंमत 1,24,999 रुपये (एक्स-शोरूम) असून 170  ची रेंज देते. दरम्यान, स्कूटरची ARAI सर्टिफाइड रेंज जास्त आहे, परंतु कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती दिली आहे.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन