शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ola Scooter मिळतेय मोफत, फक्त करावे लागेल 'हे' काम; Bhavish Aggarwal यांचे ट्विट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 15:14 IST

Ola Scooter : ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)  प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एक खास ऑफर आणली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. यातच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या कंपनी विविध ऑफर आणत आहेत. अशातच ओला इलेक्ट्रिकचे (Ola Electric)  प्रमुख भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) यांनी एक खास ऑफर आणली आहे. याअतंर्गत तुम्हालाही ओला इलेक्ट्रिक स्कूटर मोफत  (Free Ola Scooter) हवी आहे का? मग, तुम्हाला यासाठी एक काम करावे लागणार आहे.  

भाविश अग्रवाल यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, त्यांची कंपनी 10 ग्राहकांना मोफत ओला स्कूटर देईल, जे एका चार्जमध्ये 200 किमीची रेंज पूर्ण करतील. कंपनीला असे दोन रायडर्स मिळाले आहेत. यापैकी एका रायडरने MoveOS2 आणि एकाने 1.0.16 वर हा पराक्रम केला आहे, म्हणजेच कोणताही रायडर हा पराक्रम करू शकतो. यासोबत भाविश अग्रवाल म्हणाले की, जो कोणी विजेता होईल, त्यांना जूनमध्ये कंपनीचा  Ola Futurefactory म्हटले जाईल आणि तेथे मोफत केशरी ओला स्कूटरची डिलिव्हरी दिली जाईल.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक ग्राहकांनी ओला स्कूटरबाबत सोशल मीडियावर आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. यामध्ये कंपनीच्या स्कूटरच्या रेंज आणि रिव्हर्स फीचरबाबत सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे लक्षात घेऊन कंपनीने नुकतीच आपल्या स्कूटरसाठी MoveOS2 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम लॉन्च केली आहे. याशिवाय पुण्यात ओला स्कूटरला आग लागल्याच्या घटनेमुळेही कंपनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. या घटनेनंतर कंपनीला 1,411 ओला स्कूटरही परत मागवाव्या लागल्या होत्या.

खरेदीची विंडो पुन्हा सुरू 21 मे पासून ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो पुन्हा सुरू होत आहे. Ola S1 ची दिल्लीत सध्याची किंमत 85,099 रुपये आहे आणि Ola S1 Pro ची किंमत 1,10,149 रुपये आहे. यामध्ये FAME-II आणि राज्य सरकारच्या अनुदानाचा समावेश आहे. ओला स्कूटरच्या खरेदीची विंडो याआधी 17 आणि 18 मार्च रोजी उघडण्यात आली होती.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसाय