शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Ola S1X EV : ओला १५ ऑगस्टला स्वस्त आणि मस्त स्कूटर लाँच करणार; जाणून घ्या सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 16:37 IST

ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी दुचाकी इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकने (Ola Electric) अलीकडेच भारतीय बाजारपेठेत आपली एस १ एअरला १.१० लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) बेस किमतीत एअर लाँच केली आहे. ज्यामुळे आता एस १ सीरीजमधील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. मात्र, ओला आता एस १ इलेक्ट्रिक स्कूटर सीरीजमध्ये आणखी एक मेंबर म्हणजेच नवीन स्कूटर लाँच करण्यासाठी सज्ज आहे. 

ओला इलेक्ट्रिक लवकरच एस १ एअरपेक्षा अधिक परवडणारी स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नवीन स्कूटरचे नाव एस १ एक्स ( S1X) असेल, जे एंट्री-लेव्हल मॉडेल म्हणून काम करेल आणि या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२३ ला लाँच केले जाईल. हे सुरू केल्यानंतर कंपनीची व्याप्ती आणखी वाढणार आहे. तसेच, जे कमी किंमतीत दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय म्हणून उदयास येईल.

दरम्यान, ओला एस १ एअर आपल्या थेट प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आधीच परवडणारी आहे. मात्र, एस १ एक्स आणखी खरेदीदारांना आकर्षित करण्यात मदत करेल. कारण कंपनीने पुष्टी केली आहे की नवीन स्कूटर १ लाख रुपयांच्या कमी किंमतीला लाँच केली जाईल. ओला इलेक्ट्रिक ही सध्या देशातील सर्वात जास्त विक्री करणारी इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी आहे, कंपनीने जून २०२३ मध्ये १७,५७९ युनिट्सची विक्री नोंदवली आहे.

स्टूटरच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशनकंपनीने अद्याप एस १ एक्स बद्दल कोणतेही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही, परंतु कंपनीच्या ऑफिशियल प्रझेंटेशनमध्ये असे म्हटले आहे की, नवीन एस १ एक्स 'ICE किलर' असणार आहे.  एस १ एक्स समान किमतीच्या 125 सीसी पेट्रोल स्कूटरच्या तुलनेत कशी मायलेज देते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. प्रझेंटेशनदरम्यान कंपनीने दाखवलेल्या फोटोनुसार, एस १ एक्स काही स्पष्ट कॉस्ट कटिंग टेक्नॉलॉजीसह एस १ एअर आणि एस १ प्रो या भावंडांपेक्षा अधिक बेअर-बोन्स डिझाइन ऑफर करते. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरbikeबाईक