OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

By हेमंत बावकर | Published: May 20, 2022 02:39 PM2022-05-20T14:39:35+5:302022-05-20T14:45:35+5:30

ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! जुन्या जाणत्या कंपनीने सॉल्लिड स्कूटर आणलीय. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत.

OLA S1 Pro Vs TVS iQube ST: Ola Scooter's purchase window is open, but wait a minute! Greater options than the ones offered by TVS iQube ST range is 145 km per charge | OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

OLA S1 Pro Vs TVS iQube ST: ओला स्कूटरची पर्चेस विंडो खुली झाली, पण जरा थांबा! TVS ने दिला त्याहून भारी पर्याय

googlenewsNext

-हेमंत बावकर

ओलाच्या स्कूटर भविष्यातही जळत राहतील, असे वक्तव्य करून ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी पुढच्याच आठवड्यात ओलाच्या स्कूटरची पर्चेस विंडो खुली केली आहे. आजपासून पुढील काही दिवस ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करता येणार आहे. लगेच तुटून पडू नका, थोडं थांबा. कारण जुन्या जाणत्या टीव्हीएसने आयक्यूबची रेंज ओलापेक्षाही वाढविली आहे. 

ओलाच्या एस१ प्रोची रस्त्यावरील खरीखुरी रेंज १३५ किमी आहे. परंतू टीव्हीएसच्या स्कूटरची रेंज १४५ किमी आहे. टीव्हीएसने दोन दिवसांपूर्वी आयक्यूबची तीन अपडेटेड मॉडेल लाँच केली आहेत. यामध्ये आयक्यूब एसटीची ऑन रोड रेंज १४५ किमी आहे शिवाय या कंपनीला दणकट स्कूटर बनविण्याचा अनुभवही आहे. 

सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत...

ओलाच्या आजवर दोन स्कूटर पेटल्या आहेत. याचबरोबर जेव्हापासून लाँच केलीय तेव्हापासून क्वालिटीच्या शेकडो समस्या आहेत. ओला एस१ प्रोचा रिव्हर्समोड तर एवढा भयानक आहे की ज्यांनी याचे व्हिडीओ पाहिलेत ते हादरले आहेत. फिटिंग नीट नाहीय. अनेकांना एक, दोन दिवस गाडी उभी ठेवली तर बॅटरी उतरल्याची समस्या जाणवत आहे. अशा एक ना अनेक समस्या आहेत. शिवाय आता ही स्कूटर १.०८ लाखांना मिळत नाही. 

ओलाच्या स्कूटरची किंमत वाढली आहे. महाराष्ट्रात अर्ली बर्ड सबसिडी बंद झाली आहे. यामुळे ही स्कूटर तुम्हाला १.४० लाखांपर्यंत मिळते. कंपनीकडून समस्यांवर काहीच रिप्लाय येत नाही, काहीच मदत मिळत नाही म्हणून बीडमध्ये एकाने तर स्कूटरला आग लावली होती. औरंगाबादमध्ये एकाची स्कूटर तर मोडून पडली होती. यापेक्षा टीव्हीएस कंपनीचे शोरुम तुमच्या शहरात, आजुबाजुला आहेत. त्यांची सर्व्हिस सेंटरदेखील आहेत. यामुळे काही समस्या आलीच तर तुम्ही दुसऱ्या गाडीने निदान तिथे जाऊ तरी शकता. ओलाने अनेक प्रश्नांची उत्तरेच लोकांना दिलेली नाहीत. 

आणखी एक मोठी बाब म्हणजे ओलाचे एका मागोमाग बडे अधिकारी कंपनी सोडून जाऊ लागले आहेत. स्कूटरची डिलिव्हरी सुरु झाली तेव्हाच कंपनीला क्वालिटी हेड नोकरी सोडून गेला. या महिन्यात दोन बड्या अधिकाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे आताच सुरु झालेल्या या कंपनीत सारे काही आलबेल नाहीय. यामुळे ओलाच्या स्कूटरला तगडा पर्याय असलेल्या टीव्हीएस आयक्यूबचा विचार करता येऊ शकेल. 

TVS iQube ST: आयक्यूब एसटी टीव्हीएस मोटर डिझाइन 5.1kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यात सात इंचाची टीएफटी स्क्रीनसह जॉयस्टीक इंटरअॅक्टीव्हिटी, म्युझिक कंट्रोल, व्हीकल हेल्थ, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेटसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. यात नाइट थीम, पर्सनलायजेशन, व्हाइस असिस्ट आणि टीव्हीएस आयक्यूब अॅलेक्सा स्किलसेट देण्यात आली आहे. 

Web Title: OLA S1 Pro Vs TVS iQube ST: Ola Scooter's purchase window is open, but wait a minute! Greater options than the ones offered by TVS iQube ST range is 145 km per charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.