सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:12 PM2022-05-18T16:12:40+5:302022-05-18T16:13:29+5:30

देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. यातच अनेक दिग्गज ऑटो कंपन्या आपले नवे प्रोडक्ट बाजारात दाखल करत आहे.

tvs iqube electric scooter launched in three variants with 5 inch tft screen range of 140km in single charge | सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत...

सिंगल चार्जमध्ये संपूर्ण शहर फिरा! TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर ३ व्हेरिअंटमध्ये लॉन्च; पाहा फिचर्स अन् किंमत...

googlenewsNext

देशात इलेक्ट्रिक टू-व्हीलरची मागणी दिवसेंदिवस वाढत जात आहे. यातच अनेक दिग्गज ऑटो कंपन्या आपले नवे प्रोडक्ट बाजारात दाखल करत आहे. TVS मोटरनं आज भारतात आपली नवी 2022 iQube इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. देशात या स्कूटरची सुरुवातीची किंमत ९८,५६४ रुपये (ऑन रोड-दिल्ली) इतकी असणार आहे. स्कूटर तीन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यात TVS iQube, iQube S आणि iQube ST यांचा समावेश आहे. यातील S व्हेरिअंटची किंमत १,०८,६९० रुपये इतकी आहे. तर ST व्हर्जनची किंमत अद्याप कळू शकलेली नाही. 

ग्राहकांना आजपासून आयक्यूब आणि आयक्यूब एसचं बुकिंग करु शकणार आहेत. तर आयक्यूब एसटीचं प्री-बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. स्कूटरची डिलिव्हरी तात्काळ सुरू होईल. आयक्यूब आणि आयक्यूब एस इलेक्ट्रिक स्कूटर सध्या ३३ शहरांमध्ये उपलब्ध आहे. तर लवकरच आणखी ५२ शहरांमध्ये उपलब्ध होईल. ग्राहकांची पसंती, आरामदायी आणि साधेपणा या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करुन टीव्हीएसनं आपली इलेक्ट्रिक स्कूटर दाखल केली आहे. उत्तम रेंज, स्टोरेज, कलर आणि कनेक्टिव्हिटी फीचरच्या आधारावर इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकते. यासोबतच ऑफ बोर्ड चार्जर देण्यात येणार आहे. यातही तीन पर्याय असणार आहेत. 650W, 950W आणि 1.5kW 

TVS iQube ची रेंज आणि टॉप स्पीड: स्कूटरचा बेस आणि एस व्हेरिअंट सिंग चार्जवर १०० किमी रेंज देईल. तर टॉप ऑफ लाइन एसटी व्हेरिअंट १४० किमीची रेंज देईल. तिनही व्हेरिअंटची सध्याची रेंज याआधीच्या मॉडलपेक्षा तुलनेनं जास्त आहे. याआधी टीव्हीएसची इलेक्ट्रिक स्कूटर ७५ किमी रेंज देत होती. 

TVS iQube: टीव्हीएस आयक्यूब या बेस व्हेरिअंटमध्ये टर्न-बाय-टर्न नेविगेशन असिस्टसोबतच पाच इंचाचा टीएफटी स्कीन देण्यात आली आहे. ही स्कूटर तीन रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. ही स्कूटर 3.4kWh च्या टीव्हीएस मोटारनं डिझाइन केलेल्या बॅटरीसोबत उपलब्ध आहे. 

TVS iQube S: आयक्यूबर एसमध्ये देखील बेस मॉडलचीच बॅटरी आहे. पण यात सात इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे. यात इंटरेक्शन, म्युजिक कंट्रोल, थीम पर्सनायजेशन, व्हीकल हेल्थसोबतच प्रोअॅक्टीव्ह नोटिफिकेशनसाठी एक जॉयस्टीक देण्यात आली आहे. ही स्कूटर चार रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे. 

TVS iQube ST: आयक्यूब एसटी टीव्हीएस मोटर डिझाइन 5.1kWh बॅटरी पॅकसह उपलब्ध आहे. यात सात इंचाची टीएफटी स्क्रीनसह जॉयस्टीक इंटरअॅक्टीव्हिटी, म्युझिक कंट्रोल, व्हीकल हेल्थ, 4G टेलिमॅटिक्स आणि OTA अपडेटसारखे कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. यात नाइट थीम, पर्सनलायजेशन, व्हाइस असिस्ट आणि टीव्हीएस आयक्यूब अॅलेक्सा स्किलसेट देण्यात आली आहे. 

Web Title: tvs iqube electric scooter launched in three variants with 5 inch tft screen range of 140km in single charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.