शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ola S1 Air ची धूम! बुकिंग विंडो उघडताच 3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 13:14 IST

या स्कूटरची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. बुकिंग विंडो उघडताच ग्राहकांची धूम पाहायला मिळाली. 

नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीच्या बाबतीत ओला (Ola) पहिल्या क्रमांकावर आहे. कंपनीने अलीकडेच Ola ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर  S1 Air लाँच केली आहे. या स्कूटरची बुकिंग आजपासून सुरू झाली आहे. बुकिंग विंडो उघडताच ग्राहकांची धूम पाहायला मिळाली. 

बुकिंगच्या पहिल्या काही तासांतच  3 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री झाली आहे. यासंदर्भातील माहिती कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे दिली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक स्कूटर  S1 Air ची सुरुवातीची किंमत 1.09 लाख रुपये असणार आहे. याचबरोबर, स्कूटरची मर्यादित खरेदी विंडो 28 ते 30 जुलै दरम्यान उघडली जाईल, त्यानंतर खरेदीदारांना स्कूटरसाठी 1.20 लाख (एक्स-शोरूम) भरावे लागतील.

ओला S1 Air या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारात 99,999 रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आली होती. ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 91 किमीची रेंज आणि 8.5 kW मोटरसह येते. स्कूटरची बॅटरी घरातील चार्जरने चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. कंपनीकडून S1 Air स्कूटर 11 कलर ऑप्शनमध्ये ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये ओचर, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, कोरल ग्लॅम, मिडनाईट ब्लू, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, अँथ्रेसाइट ग्रे, मिलेनिअल पिंक, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट कलरचा समावेश आहे.

कधीपासून सुरू होणार डिलिव्हरी?कंपनीचे सीईओ आणि संस्थापक भाविश अग्रवाल यांनी ट्विटद्वारे सांगितले की, या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी ऑगस्टच्या सुरुवातीपासून सुरू होईल. 

टॅग्स :OlaओलाElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन