शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Ola Electric Sale Starts Today: आजपासून खरेदी करता येणार ओला स्कूटर; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 10:10 AM

Ola Electric Sale Starts Today: जर तुम्ही ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बुक केली असेल आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टींकडे तुम्हाल लक्ष द्यावे लागणार आहे. 

ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooters) भारतात धुमाकूळ करणार आहे. ही स्कूटर 15 ऑगस्टला लाँच करण्यात आली होती. तर त्या आधी महिनाभर या स्कूटरचे बुकिंग सुरु होते. ओलाने Ola S1 आणि Ola S1 Pro आजपासून विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. पहिल्याच दिवशी बुकिंगचा 1 लाखांचा टप्पा पार करणाऱ्या ओला स्कूटरला आज किती प्रतिसाद मिळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Ola Electric partners banks, financial institutes to offer loans to customers. )

जर तुम्ही ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बुक केली असेल आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टींकडे तुम्हाल लक्ष द्यावे लागणार आहे. 

Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...

ओला स्कूटरची किंमत 99999 हजारांपासून सुरु होते. दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी सबसिडी जाहीर केली आहे. तर ज्या राज्यांमध्ये सबसिडी नाही त्यांना फक्त केंद्र सरकारचीच सबसिडी मिळणार आहे. 

कशी खरेदी करणार?Ola Electric Scooters ची कोणतीही डिलरशीप नाहीय. ही स्कूटर तुम्ही ऑनलाईनच खरेदी करू शकता. आजपासून ओलाने विक्री सुरु केली आहे. कर्ज, अॅडव्हान्स आणि उरलेली रक्कम कधी भरायची, कशी भरायची याची माहिती खाली देत आहोत. जर तुम्हाला बुकिंग रद्द करायचे असेल तरी देखील ते कधीपर्यंत करता येईल ते देखील सांगणार आहोत. अनेक लोकांनी ओलाला टेस्ट ड्राईव्हशिवाय तुमच्यावर पैसे का उधळायचे असे प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतू कंपनीने फक्त टेस्ट ड्राईव्ह करता येईल असेच सांगितले आहे. परंतू याची सोय कुठे, कधी केली जाईल याबाबत काहीही सांगितलेले नाही. 

गावातील लोकांना आजुबाजच्या पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात जाऊन टेस्ट ड्राईव्ह करावी लागण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीच्या काळात कंपनी छोट्या छोट्या शहरांमध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी ही स्कूटर उपलब्ध करण्याची शक्यता कमी आहे. 

महत्वाची लिंक... OLA Scooter बुक केलीय का? आज खरेदीची पहिली संधी; जाणून घ्या प्रोसेस..टेस्ट राईड न घेताच कशी घ्यायची?कोणतीही स्कूटर, बाईक किंवा कार ही टेस्ट राईड घेतल्याशिवाय आपण घेत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या देखील फसवितात. राईड हँडलिंग, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, फिचर्स काय आहेत हे पाहिल्याशिवाय घेऊ नका. ओला ऑक्टोबर पासून टेस्ट राईड आयोजित करणार आहे. टेस्ट राईड घेतल्यानंतरच निर्णय घ्या. तसेच टेस्ट राईड घेतली की त्यानंतर फॅक्टरीतून शिप होईस्तोवर तुमच्याकडे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय आहे. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन