शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

Odysse Vader : भारतात लॉन्च झाली स्वस्त इलेक्ट्रिक बाईक, 125Km ची रेंज; फक्त 999 रुपयांत करा बुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2023 20:50 IST

भारतातील इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये एका नवीन प्लेअरने एंट्री घेतली आहे.

Odysse Vader : इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये आणखी एका नवीन प्लेअरने एंट्री घेतली आहे. आघाडीचे इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्टार्टअप Odysse Electric ने आज आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Odysse Vader बाजारात आणली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकने सुसज्ज असलेली ही देशातील पहिली बाईक आहे, ज्यामध्ये 7-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याचा वापर Android डिस्प्ले आणि Google Map नेव्हिगेशनसाठी केला जाईल. कंपनीने ही बाईक फक्त 1,09,999 रुपये (एक्स-शोरुम, अहमदाबाद) च्या किमतीत लॉन्च केली आहे.

फक्त किंमतच नाही तर Odysse Vader अनेक प्रकारे खास आहे. ही इलेक्ट्रिक बाइक दैनंदिन वापरासाठी अतिशय योग्य सिद्ध होईल. कंपनीने यामध्ये 18 लिटर क्षमतेचे स्टोरेज स्पेसही दिले आहे. याशिवाय ही बाईक वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात मिडनाईट ब्लू, फेयरी रेड, ग्लॉसी ब्लॅक, व्हेनम ग्रीन आणि मिस्टी ग्रे यांचा समावेश आहे.

बॅटरी पॅक आणि परफॉर्मन्स:कंपनीने या बाईकमध्ये 3.7 kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी 3 kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरला जोडलेली आहे. ही इलेक्ट्रिक मोटर 6 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये 125 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते आणि याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात. या बाईकचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास आहे.

फक्त 999 रुपयांत बुक करा:

नवीन Odysse Vader लॉन्च करण्यासोबतच कंपनीने अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक ही बाईक कंपनीच्या अधिकृत डीलरशिपद्वारे फक्त रु.999 मध्ये बुक करू शकतात. येत्या जुलै महिन्यापासून या बाईकची डिलिव्हरी सुरू होणार असून, या बाईकचे ग्राहक फेम-2 सबसिडीचा लाभ घेऊ शकतात.

 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbikeबाईक