मारुती नाही, टाटा तर मुळीच नाही; या कंपनीने भारतातून ७० देशांना कार पाठविल्या... हे तिच करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 21:53 IST2025-04-02T21:53:25+5:302025-04-02T21:53:47+5:30

कंपनीने भारतात तर विक्री केलीच परंतू भारतात निर्माण केलेल्या दणकट कार ती भारतातून ७० देशांना पुरवत आहे.

Not Maruti, not Tata at all; this company sent cars from India to 70 countries... | मारुती नाही, टाटा तर मुळीच नाही; या कंपनीने भारतातून ७० देशांना कार पाठविल्या... हे तिच करू शकते

मारुती नाही, टाटा तर मुळीच नाही; या कंपनीने भारतातून ७० देशांना कार पाठविल्या... हे तिच करू शकते

भारतात काही वर्षांपूर्वी जगातील सर्वात मोठ्या कार कंपनीने एन्ट्री केली होती. या कंपनीने भारतात तर विक्री केलीच परंतू भारतात निर्माण केलेल्या दणकट कार ती भारतातून ७० देशांना पुरवत आहे. ही कंपनी म्हणजे स्कोडाफोक्सवॅगन आहे. 

फोक्सवॅगन भारतात जेवढ्या कार बनविते त्याच्या ४० टक्के कार या परदेशात निर्यात करते. २०२४ मध्ये या कंपनीने उत्तर अमेरिका, आफ्रिका, एजीसीसी आणि आशियाई या कार निर्यात केल्या आहेत. यामुळे या कंपनीला मुंबई बंदर प्राधिकरणाने "टॉप एक्सपोर्टर २०२३-२०२४" म्हणून पुरस्कार दिला आहे. २०२३ मध्ये उत्पादनात वार्षिक (YoY) ३८% वाढ केली होती. ही वाढ एकूण उत्पादनाच्या ३० टक्के होती. 

सध्या फोक्सवॅगन ही करचोरीच्या गुन्ह्यात अडकलेली आहे. भारत सरकारने या कंपनीला वेगवेगळ्या खेपांमध्ये अखंड कार बनविण्याचे सुटे भाग मागविले आणि भारतात त्यापासून अखंड कार बनविल्या व करचोरी केल्याचा आरोप या कंपनीवर ठेवण्यात आला आहे. हे प्रकरण सध्या न्यायालयात असून जर निकाल विरोधात लागला तर कंपनीला मोठा झटका बसणार आहे. 

आतापर्यंत या समूहाने ६,७५,००० हून अधिक वाहनांची निर्यात केली आहे. २०२३-२४ मध्ये, स्कोडाने आशिया, आफ्रिका आणि उत्तर अमेरिकेतील २६ हून अधिक देशांमध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित ४३,००० हून अधिक कार निर्यात केल्या आहेत. एकीकडे स्वत:च्या देशातील असलेले प्लांट बंद करून कंपनी भारतातून एक्स्पोर्ट वाढवत आहे, ही भारत हा भविष्यात ऑटो हब बनण्याची नांदी आहे. मेड-इन-इंडिया कार आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहेत. यामुळे भारतात परदेशी कंपन्यांच्या फॅक्टरी वाढण्याचे संकेत आहेत. 

Web Title: Not Maruti, not Tata at all; this company sent cars from India to 70 countries...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.