शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर 80 लाख लोकांचा रोजगार जाईल', मंत्री असेपर्यंत भारतात अशा कार येऊ देणार नाही! गडकरी यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 19:42 IST

"टेस्लाचे भारतात स्वागत आहे. भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणे स्वीकार्य नाही. आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ, पण त्यांना चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून भारतात विकता येणार नाही. हे शक्य नाही," असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

भारतात ड्रायव्हरलेस अथवा ऑटोनॉमस कार लॉन्च केल्या जाणार नाहीत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. "जोवर मी मंत्री आहे, तोवर ड्रायव्हरलेस कार भारतात लॉन्च करण्यास परवानगी दिली जाणार नाही," असे गडकरी यांनी म्हटले आहे. ते आयआयएम नागपूरने आयोजित केलेल्या 'झिरो माईल' कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

यावेळी नितीन गडकरी यांनी ऑटोमोबाईल अभियांत्रिकीतील बदलांवर भर दिला. जसे की, कारमध्ये सहा एअरबॅग्ज समावेश करणे, रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्स कमी करे आणि मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढविणे आदी. तसेच, "आम्ही मोटार वाहन कायद्याद्वारे दंड वाढविला आहे, रुग्णवाहिका आणि क्रेन ठेवले आहेत, जेणेकरुन येथून गोष्टी सुरळीत होतील. आम्ही दरवर्षी जनजागृती देखील करतो," असेही गडकरी यांनी म्हटले आहे.

ड्रायव्हरलेस कार भारतात येणार नाहीत -बिझनेस टुडेच्या एका प्रश्नावर बोलताना नितिन गडकरी म्हणाले, "मी कधीही ड्रायव्हरलेस कार भारतात येऊ देणार नाही, कारण असे झाले तर, अनेक ड्रायव्हर्सना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि मी असे होऊ देणार नाही. याच वेळी "टेस्लाचे भारतात स्वागत आहे. भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करणे स्वीकार्य नाही. आम्ही टेस्लाला भारतात येण्याची परवानगी देऊ, पण त्यांना चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करून भारतात विकता येणार नाही. हे शक्य नाही," असेही गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहन