निस्सान भारतीय बाजारात आणखी दोन कार आणणार; एक पाच सीटर, एक सात सीटर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 15:12 IST2025-03-28T15:10:55+5:302025-03-28T15:12:04+5:30

जपानमध्ये झालेल्या ग्लोबल प्रॉडक्ट शोकेसमध्ये निस्सानने भारतासाठी बनविलेल्या दोन कार दाखविल्या होत्या. 

Nissan to launch two more cars in Indian market; one five-seater, one seven-seater... | निस्सान भारतीय बाजारात आणखी दोन कार आणणार; एक पाच सीटर, एक सात सीटर...

निस्सान भारतीय बाजारात आणखी दोन कार आणणार; एक पाच सीटर, एक सात सीटर...

निस्सान भारतीय बाजारात आता आपली उपस्थिती वाढवू इच्छित आहे. होंडासोबतची डील तोडल्यानंतर निस्सानने विस्ताराकडे लक्ष केंद्रीत केले आहे. भारतात निस्सानची केवळ मॅग्नाईट हीच एक कार उपलब्ध आहे. आता येत्या काळात कंपनी दोन नवीन कार लाँच करणार आहे. जपानमध्ये झालेल्या ग्लोबल प्रॉडक्ट शोकेसमध्ये निस्सानने भारतासाठी बनविलेल्या दोन कार दाखविल्या होत्या. 

नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....

यामध्ये एक सात सीटर एमपीव्ही आणि पाच सीटर एसयुव्ही कार असणार आहे. या कार याच वर्षी भारतात लाँच केल्या जाण्याची शक्यता आहे. कंपनीने गुरुवारी भारतासाठीच्या दोन कारची झलक दाखविली. भारतीय ग्राहकांसाठी कंपनी आर्थिक वर्ष २०२६ पर्यंत चार नव्या कार लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. यापैकीच या दोन आहेत. 

आता या कार कोणत्या आहेत, यावरून चर्चा सुरु झाली आहे. रेनॉकडे असलेल्याच कार निस्सान भारतीय बाजारात नव्या रुपात लाँच करू शकते. २ सी-एसयूव्ही (५ आणि ७-आसनी), परवडणाऱ्या दरातील ईव्ही, न्यू निस्सान मॅग्नाइट आणि निस्सान एक्स-ट्रेल यांचा समावेश असणार आहे. 

निस्सान आपल्या ताफ्यात एक ईव्ही कार देखील आणणार आहे. यामुळे आता ही कार कोणती असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी जी घोषणा झाली ती ऑल न्यू ७-आसनी बी-एमपीव्हीची आहे. ही कार रेनॉच्या ट्रायबरचेच रुप बदललेले मॉडेल असण्याची शक्यता आहे. निस्सान आणि रेनॉ़ या कंपन्या एकसारख्याच कार भारतीय बाजारात आणत असतात. निस्सानची यापूर्वीची अनेक मॉडेल्स यापूर्वीच बंद करण्यात आली होती. मॅग्नाईटने निस्सानला भारतीय बाजारात तारले असून आता काही वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा ही कंपनी नवीन उत्पादने घेऊन भारतीय बाजारात उतरत आहे. 

Web Title: Nissan to launch two more cars in Indian market; one five-seater, one seven-seater...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.