मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:51 IST2025-07-25T13:51:26+5:302025-07-25T13:51:58+5:30

Nissan Magnite Ncap Crash Test Result: भारतात आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कारमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टाटाने सुरुवात करून दिली आणि नंतर आता अशक्य वाटणाऱ्या मारुतीनेही डिझायरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत कमाल केली आहे.

Nissan Magnite Ncap Rating: Made in India car crash tested in Global NCAP; brought a star that is not to be taken lightly... | मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...

मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...

भारतीय बाजारात साडे सहा लाखांच्या एक्स शोरुम किंमतीत मस्क्युलर आणि बोल्ड दिसणारी कॉम्पॅक्ट एसयुव्ही निस्सान मॅग्नाईटने कमाल करून दाखविली आहे. भारतात तयार झालेल्या निस्सान मॅग्नाईटची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट करण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नाईटने फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळविली आहे. 

नव्या पिढीची निस्सान मॅग्नाईट, कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटमधील 'हल्क', हलक्यात घेण्यासारखी नसलेली....

निस्सान मॅग्नाईटला एडल्ट ऑक्युपेंटसाठी ५ स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंटसाठी ३ स्टार सेफ्टी रेटिंग देण्यात आली आहे. यानुसार एकंदरीत निस्सान मॅग्नाईटने ५ स्टार रेटिंग मिळविली आहे. भारतात आता फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंगच्या कारमध्ये कमालीची वाढ झाली आहे. टाटाने सुरुवात करून दिली आणि नंतर आता अशक्य वाटणाऱ्या मारुतीनेही डिझायरला फाईव्ह स्टार रेटिंग मिळवत कमाल केली आहे. या यादीत आता निस्सानची भर पडलेली आहे. 

निस्सानने वन कार वन वर्ल्ड पॉलिसी सुरु केली असून भारतात बनणारी ही मॅग्नाईट कार ६५ देशांना निर्यात केली जाते. ६ एअरबॅग्ज, ६७ टक्के उच्च दर्जाच्या असलेल्या स्टीलपासून बनवलेली बॉडी स्ट्रक्चर, BS + EBD, ESC, TCS, HSA, ब्रेक असिस्ट, TPMS यांचा समावेश आहे. 

निस्सानने नुकतीच मॅग्नाईटचे सीएनजी व्हर्जन लाँच केले आहे. सीएनजी किट कंपनी फिटेड नाही तर रेट्रो फिटेड असणार आहे. या कारची किंमत कंपनीने ₹६.८९ लाख रुपये ठेवली आहे. डीलर स्तरावर हे किट मिळणार आहे. भविष्यात निस्सान सात सीटर एमपीव्ही, छोटी कार आणणार आहे. 

Web Title: Nissan Magnite Ncap Rating: Made in India car crash tested in Global NCAP; brought a star that is not to be taken lightly...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.