Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची सीएनजी कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:43 IST2025-10-17T11:43:04+5:302025-10-17T11:43:32+5:30
भारतीय ऑटो बाजारात सीएनजी कार्सची वाढती मागणी लक्षात घेऊन, निसान इंडियाने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'मॅग्नाइट'मध्ये एक मोठे आणि ग्राहक-केंद्रित बदल केले आहेत. 2

Nissan Magnite CNG : पेट्रोल दरवाढीला 'बाय बाय'! निसानची सीएनजी कार ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह लाँच; किंमत ऐकून खूश व्हाल
भारतीय ऑटो बाजारात सीएनजी कार्सची वाढती मागणी लक्षात घेऊन, निसान इंडियाने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही 'मॅग्नाइट'मध्ये एक मोठे आणि ग्राहक-केंद्रित बदल केले आहेत. कंपनीने आता मॅग्नाइटच्या सीएनजी व्हर्जनला ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन गियरबॉक्ससह लाँच केले आहे. यापूर्वी हे मॉडेल केवळ मॅन्युअल पर्यायातच उपलब्ध होते, परंतु आता ऑटोमेशनची जोड मिळाल्यामुळे, विशेषतः शहरी ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पेट्रोल भरण्यासारखं सीएनजी भरणंही झालं सोपं!
निसानने या नव्या मॉडेलमध्ये एक अतिशय महत्त्वाचा आणि सोयीचा बदल केला आहे. आतापर्यंत मॅग्नाइटमध्ये सीएनजी भरण्यासाठी इंजिनचा बोनेट उघडावा लागत असे, जो खूपच किचकट प्रकार होता. परंतु आता कंपनीने सीएनजी भरण्याचा वॉल्व थेट इंधनाच्या झाकणाखाली दिला आहे.
याचा अर्थ, पेट्रोल भरताना तुम्ही जसे मागील बाजूने इंधनाच्या टाकीचे झाकण उघडता, अगदी त्याचप्रमाणे आता सीएनजी भरता येणार आहे. हा बदल रिफ्युलिंग अधिक सुरक्षित आणि अत्यंत सोपे बनवतो.
नवीन फीचर्स, व्हॅरिएंट्स आणि किंमत
नवीन Nissan Magnite CNG AMT एकूण ११ व्हॅरिएंट्समध्ये उपलब्ध असेल.
किंमत (एक्स-शोरूम): या मॉडेलची किंमत ६.३४ लाख रुपयांपासून सुरू होऊन ९.७० लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
टॉप व्हॅरिएंट: टॉप-स्पेक मॅन्युअल व्हॅरिएंटची किंमत ९.२० लाख रुपये आहे, तर AMT टॉप व्हॅरिएंट ९.७० लाख रुपयांना उपलब्ध आहे.
इंजिन आणि किट: मॅग्नाइटच्या १.०-लिटर, ७२ एचपी नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनमध्ये आता कंपनी-मान्यताप्राप्त सीएनजी किट बसवून घेता येणार आहे. ही किट केवळ निसानच्या अधिकृत डीलरशिपवरच फिट केली जाईल आणि ती कंपनीच्या स्टँडर्ड वॉरंटीमध्ये समाविष्ट आहे.
किफायतशीर किट: जीएसटी २.० मध्ये झालेल्या सुधारणांमुळे सीएनजी किटच्या किमतीत सुमारे ३,००० रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे, आता ही किट केवळ ७२,००० रुपयांच्या आसपास इन्स्टॉल करता येते.
वॉरंटी: या मॉडेलवर कंपनीकडून ३ वर्षांची किंवा १ लाख किलोमीटरची स्टँडर्ड वॉरंटी दिली गेली आहे. ग्राहकांना खात्री वाटावी, त्यांचा ब्रँडवरील विश्वास वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे.
ग्राहकांसाठी ‘बेस्ट डील’ कशी?
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय बाजारात सीएनजी कार्सची मागणी वेगाने वाढत आहे. Magnite CNG आधीपासूनच कमी रनिंग कॉस्ट, उत्तम मायलेज आणि आकर्षक SUV लुकमुळे लोकप्रिय होती.
बजेटमध्ये बसणारी आणि इंधनावरचा खर्चही कमी असणारी ऑटोमॅटिक कार शोधणाऱ्यांसाठी ही निस्सान मॅग्नाइट चांगला पर्याय ठरू शकते. कंपनीने असा दावा केला आहे की, ही नवीन एसयुव्ही 'स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपीरियंस', सुधारित मायलेज आणि कमी देखभाल खर्च देईल. या सेगमेंटमध्ये हा एक अतिशय परवडणारा आणि मॉडर्न पर्याय ठरण्याची शक्यता आहे.