शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

‘या’ कंपनीसाठी गेम चेंजर ठरली ₹५.९९ लाखांची जबरदस्त SUV, लाखापेक्षा जास्त विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 11:38 AM

कंपनीच्या कारनं विक्रीत नोंदवली मोठी वाढ. या स्वस्त आणि मस्त एसयुव्हीला मिळतेय ग्राहकांची पसंती.

निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं (NMIPL) 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 94,219 युनिट्सची विक्री केल्याची माहिती दिली आहे. या कालावधीत कंपनीनं विक्रीत तब्बल 23 टक्क्यांची वाढ नोंदवली. दरम्यान, देशांतर्गत घाऊक विक्री 33611 युनिट्सची आणि 60608 युनिट्सची निर्यात केली. मार्च 2023 मध्ये एकूण 10,519 युनिट्सची घाऊक विक्री झाली, ज्यामध्ये या महिन्यात 73 टक्क्यांची वाढ झाली. त्याचप्रमाणे देशांतर्गत घाऊक विक्रीचा आकडा 3260 युनिट इतका होता, तसंच 7259 युनिट्सची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये देशांतर्गत बाजारात 3007 युनिट्सची विक्री झाली होती आणि 4976 युनिट्सची निर्यात करण्यात आली होती.

ठरली गेम चेंजरनिसान मॅग्नाईट (Nissan Magnite) लाँच झाल्यापासून ही कार त्याच्या सेगमेंटमध्ये गेम चेंजरची भूमिका बजावत आहे. ही मेक-इन-इंडिया SUV निसानसाठी एक यश असल्याचं म्हटलं जातंय. भारताच्या देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यात बाजारपेठेत या कारनं 1 लाखाहून अधिक ग्राहक बुकिंग नोंदवली आहेत. बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये ती पसंतीची एसयूव्ही ठरली आहे. या कारचं डिझाइन जपानमध्ये करण्यात आलं असून भारतात या कारचं उत्पादन करण्यात आलंय.

'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' यावर आधारित निसाननं 2022-23 मध्ये 1 मिलियन युनिट्सचा निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे. निसान इंडियानं सप्टेंबर 2010 मध्ये निर्यात सुरू केली आणि सध्या त्याच्या चेन्नई येथील रेनो-निसान ऑटोमोटिव्ह इंडिया लिमिटेड प्लांटमधून न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व आशियाई देश, लॅटिन अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया, सार्क देश आणि अनेक युरोपीय देशांसह 108 देशांमध्ये निर्यात केली जाते.

BS6 स्‍टेज-2 नुसार उत्पादननिसानने 1 एप्रिल 2023 रोजी BS6 स्टेज-2 एमिशन नॉर्म्स लागू होण्यापूर्वीच, मॅग्नाइटची BS6 स्टेज-2 RDE-कम्पियंट व्हेरिअंट बाजारात आणलं आहे. 2023 निसान मॅग्नाईट सर्व कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह येते. या कारला GNCAP 4.0 रेटिंग मिळालं आहे.

कंपनीचे ग्लोबल सीओओ अश्वनी गुप्ता यांनी अलीकडेच भारतात 600 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 5300 कोटी रुपयांच्या गुंतवण्याच्या योजनांची माहिती दिली होती. निसान इंडिया ईव्ही श्रेणीतील तीन नवीन मॉडेल्स, दोन सी-सेगमेंट एसयूव्ही आणि एक ए-एसयूव्ही सादर करणार आहे.

 

टॅग्स :Nissanनिस्सानcarकार