शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

मुकेश अंबानींच्या घरी आली १३ कोटींची Rolls-Royce; १ कोटींचा स्पेशल पेंट अन् १२ लाखांची VIP नंबर प्लेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 11:37 AM

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींच्या ताफ्यात एकापेक्षा एक महागड्या आणि लग्जरी कारचा समावेश आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानींच्या ताफ्यात एकापेक्षा एक महागड्या आणि लग्जरी कारचा समावेश आहे. नुकतंच मुकेश अंबानींच्या कुटुंबानं आपल्या ताफ्यात तिसऱ्या रॉल्स रॉयस कारचा समावेश केला. माध्यमांमधील वृत्तानुसार मुकेश अंबानींच्या ताफ्यात दाखल झालेली नवी कार देशातील सर्वात महागडी कार आहे आणि या कारवर १ कोटी रुपये खर्च करून पेंट करण्यात आला आहे. 

रॉल्स रॉयसच्या कार एकतर खूप महागड्या आणि कस्टमायजेशनसाठी खूप लोकप्रिय आहेत. युझर्स आपल्या पसंतीनुसार कारमध्ये बदल करू शकतात. आता मुकेश अंबानींनी खरेदी केलेल्या नव्या रॉल्स रॉयस कारमध्ये नेमके काय बदल करण्यात आलेत ते जाणून घेऊयात. 

१३.१४ कोटींची काररोल्स-रॉयल कलिनन कार मुकेश अंबानींच्या सिक्युरिटी कारच्या फ्लीटमध्ये मर्सिडिज-AMG आणि MG Gloster सोबत दिसून आली आहे. पीटीआयनं केलेल्या दाव्यानुसार रोल्स-रॉयस कलिनन कारची किंमत १३.१४ कोटी रुपये इतकी आहे. तर या कारच्या बेस मॉडलची किंमत ६.८ कोटी रुपये आहे. कस्टमायझेशनमुळे कारच्या किमतीत वाढ होत जाते. 

१ कोटी रुपयांचा पेंटमुकेश अंबानी यांनी कस्टमायझेशनमध्ये नेमके कारमध्ये कोणकोणते बदल केलेत याची माहिती मिळू शकलेली नाही. पण अंबानींच्या नव्या रोल्स रॉयस कारला शानदार टस्कन सन कलर शेड पेंट देण्यात आला आहे. त्यामुळे कारला सर्वोत्तम रोड प्रेझेन्स प्राप्त होतो. कार इतरांपेक्षा यामुळे वेगळी ठरते आणि उठून दिसते. कारला हटके पेंट करण्यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. 

१२ लाख रुपयांची नंबर प्लेटअंबानींनी कारच्या नंबरसाठी नव्या सीरिजसाठी रजिस्ट्रेशन केलं. त्यामुळे फक्त नंबर प्लेटसाठी अंबानींनी १२ लाख रुपये खर्च केले आहेत. व्हीआयपी नंबरसाठी सामान्यत: ४ लाख रुपयांचा खर्च येतो. पण अबांनींनी थेट १२ लाख रुपये खर्चून नंबर प्लेट मिळवली आहे. मुकेश अंबानींनी नव्या कलिननसाठी ''०००१'' रजिस्ट्रेशन नंबर घेतला आहे. 

अंबानींचं Rolls-Royce कलेक्शनमुकेश अंबानींकडे याआधीपासूनच रोल्स रॉयस कारचं कलेक्शन आहे. अंबानींच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस फॅन्टम ड्रॉपहेट कूप देखील आहे. कलिनन व्यतिरिक्त अंबानींच्या ताफ्यात तीन रोल्स रॉयस कार आहेत. यात न्यू जनरेशन फॅन्टम एक्सटेंडेड व्हीलबेलचा देखील समावेश आहे. ज्याची किंमत १३ कोटी रुपये आहे.    

टॅग्स :Rolls-Royceरोल्स-रॉईसMukesh Ambaniमुकेश अंबानी