'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 12:30 PM2023-07-21T12:30:07+5:302023-07-21T12:30:38+5:30

अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे.

most powerful electric scooters of the country the price is just under 1 lakh 50k | 'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

'या' आहेत सर्वात पॉवरफुल Electric Scooters, किंमत दीड लाखांपेक्षा कमी!

googlenewsNext

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत भारतीय ऑटो मार्केटमध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर मार्केटमध्ये अनेक नव-नवीन स्कूटर येत आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशा काही खास इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या किमती आणि परफॉर्मन्सच्या बाबतीतही खूप चांगल्या असल्याचे सिद्ध होत आहे.

TVS iQube
नवीन TVS iQube 2022 IP67 आणि AIS 156 प्रमाणित बॅटरी पॅकसह येतो. बॅटरी पॅक 650w, 950w आणि 1.5kWh चार्जिंगला सपोर्ट करतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्कूटरची किंमत एक्स-शोरूम  1 लाख 23 हजार रुपये आहे.

Ola S1 Air
ही इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जवर 91 किमीची रेंज आणि 8.5 kW मोटरसह येते. स्कूटरची बॅटरी घरातील चार्जरने चार तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. S1 Air ला 11 कलर ऑप्शन दिले आहेत. यामध्ये ओचर, लिक्विड सिल्व्हर, मॅट ब्लॅक, कोरल ग्लॅम, मिडनाईट ब्लू, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, अँथ्रेसाइट ग्रे, मिलेनिअल पिंक, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट कलरचा ऑप्शन आहे. स्कूटरची किंमत सुमारे 1 लाख 10 हजार रुपये आहे.

iVOOMi S1
iVOOMi S1 ही 84,999 रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत मिळते. यामध्ये 60V/35 Ah स्वॅप करण्यायोग्य बॅटरी देण्यात आली आहे, जी 110 किमीची प्रमाणित रेंड देते. स्कूटरचे S1 80, S1 200 आणि S1 240 असे तीन व्हेरिएंट आहेत . iVOOMi S1 चा टॉप स्पीड 55 kmph आहे.

Okinawa Praise Pro
कंपनी PraisePro मध्ये ऑल-एलईडी लाइटिंग, रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसह ई-एबीएस, डिजिटल कन्सोल, यूएसबी चार्जिंग पोर्ट, वॉक असिस्ट यांसारखी फीचर्स देत आहे. तुम्ही PraisePro स्कूटर ताशी 56 किमी वेगाने चालवू शकता. कंपनीचा दावा आहे की, Okinawa i Praise Plus सिंगल चार्जवर 137 किमीची रेंज देऊ शकते. तसेच, ही स्कूटर  3 ते 4 तासांत सहज चार्ज होऊ शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.

Web Title: most powerful electric scooters of the country the price is just under 1 lakh 50k

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.