More powerful, sporty Toyota Fortuner launched; Fortuner Legender also launched | आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी Toyota Fortuner लाँच; Fortuner Legender तर SUVचा 'बाप'

आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी Toyota Fortuner लाँच; Fortuner Legender तर SUVचा 'बाप'

नवी दिल्ली : Toyota India ने आपली पावरफुल फुलसाईज एसयुव्ही Toyota Fortuner चा नवा अवतार भारतात लाँच झाला आहे. नवीन 2021 Toyota Fortuner Facelift आधीपेक्षा जास्त ताकदवान, स्पोर्टी झाली आहे. या कारची सुरुवातीची किंमत 29.98 लाख रुपये आहे. 


याचबरोबर टोयोटाने फॉर्च्यूनरचा आणखी एक व्हेरिअंट Toyota Legender लाँच केला. या एसयुव्हीची किंमत 37.58 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 
टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 2.8 लीटरचे टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 204bhp ची ताकद आणि 500Nm चा टॉर्क प्रदान करते. या आधीच्या एसयुव्हीचे इंजिन 177 bhp ची ताकद आणि 450 Nm टॉर्क प्रदान करत होते. नवीन फॉर्च्यूनरला जास्त ताकद प्रदान करण्यात आली आहे. 2021 Toyota Fortuner Facelift ला 2.7 लीटर पेट्रोल इंजिनसोबतही लाँच करण्यात आले आहे. जे 166bhp ताकद देते. ही एसयुव्ही मॅन्युअल आणि  ऑटोमॅटिक अशा दोन्ही ट्रांसमिशनमध्ये उपलब्ध आहे. आजपर्यंत १.७ लाख फॉर्च्यूनर विकल्या गेल्या आहेत. 


2021 टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टचा लूक आणि डिझाईन खूप चांगला आहे. नवीन हेडलँप, नवीन एलईडी टेललँप, १८ इंचाचे नवीन अलॉय व्हील्स, मोठी फ्रंट ग्रील आणि नवीन डिझाईनचा रिअर बंपर देण्यात आला आहे. या एसयुव्हीमध्ये अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आल्याने ते आरामात दिसून येतात. 
टोयोटा फॉर्च्यूनर फेसलिफ्टमध्ये 8.0 इंचाची का टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम देण्यात आली आहे. जी स्मार्ट कनेक्टेड फीचरसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड सपोर्टसोबत येते. यामध्ये सीट व्हेंटिलेशन सिस्टिम, ११ स्पिकर प्रिमिअम जेबीएल देखील देण्यात आली आहे. याचबरोबर नव्या फॉर्च्यूनरमध्ये Eco, Normal आणि स्पोर्ट मोडही देण्यात आले आहेत. 


Fortuner Legender
भारतीय ग्राहकांची पसंत पाहून टोयोटाने आणखी स्पोर्टी आणि स्टायलीश व प्रिमिअम वाटणारी Fortuner Legender लाँच केली आहे. यामध्ये कम्फर्टकडे विशेष लक्ष देण्यात आहे. वायरलेस चार्जिंगसह अन्य सुविधा देण्यात आल्या आहेत. 

Web Title: More powerful, sporty Toyota Fortuner launched; Fortuner Legender also launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.