शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

MG Motors लाँच करणार ALTO पेक्षाही छोटी इलेक्ट्रिक कार! जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 09:43 IST

MG Motors : एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी दिल्ली :  ब्रिटिश कंपनी एमजी मोटर्स (MG Motors) भारतीय ऑटो मार्केटमध्ये (Indian Auto Market) मोठा धमाका करणार आहे. कंपनी अल्टोपेक्षाही छोटी कार लाँच करण्याच्या योजनेवर काम करत आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी या सेगमेंटमध्ये आपला पोर्टफोलिओ मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. एमजी मोटर्सची छोटी कार इलेक्ट्रिक कन्व्हर्टेबल असणार आहे. या कारची सध्या चाचणी सुरू असून कंपनी पुढील सहा महिन्यांत लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

रिपोर्टनुसार, एमजी मोटर्सची ही इलेक्ट्रिक कार इंडोनेशियामध्ये यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Wuling Air EV वर आधारित असणार आहे. कंपनी आपल्या छोट्या इलेक्ट्रिक कारमध्ये भारतीय परिस्थितीनुसार बदल करू शकते. कंपनीने जाहीर केले आहे की, चालू आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भारतीय ऑटो मार्केटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येईल. 

कंपनी आपल्या एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कारची बॅटरी भारतीय कंडीशननुसार तयार करत आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची लांबी. या कारची लांबी 2.9 मीटर असेल असे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत ही कार भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मारुती अल्टोपेक्षा लहान असणार आहे. अल्टोची लांबी 3.45 मीटर आहे. एमजी मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलपासून वायरलेस कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स असतील.

इतकी असू शकते किंमतएमजी मोटर्स इलेक्ट्रिक कारला 2010 mm चा व्हीलबेस मिळेल. कंपनी या कारमध्ये अलॉय व्हील्स देऊ शकते. या कारमध्ये 20kWh ते 25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक मिळू शकतो. तसेच, रिपोर्टनुसार ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 150 किमीपर्यंत प्रवास करू शकते. भारतीय ऑटो मार्केटमध्ये या इलेक्ट्रिक कारची किंमत 10 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ऑटो एक्सपो कार दिसण्याची शक्यताएमजी मोटर्स भारतीय बाजारपेठेसाठी परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर सतत काम करत आहे. एमजी मोटर्सने आगामी इलेक्ट्रिक कारला E230 असे कोडनेम दिले आहे. कंपनी आपली एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार ऑटो एक्सपो 2023 मध्ये सादर करू शकते. या कारच्या पुढील बाजूस पूर्ण लांबीचा लाइट बार दिसणार आहे. स्लिम फॉग लॅम्प बंपरमध्ये मिळेल. या इलेक्ट्रिक कारचे चार्जिंग पॉट समोरच्या बाजूला मिळणार आहे.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारMG Motersएमजी मोटर्सAutomobileवाहन