नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:00 IST2025-12-15T14:00:42+5:302025-12-15T14:00:54+5:30
MG Hector Facelift Launch Price: हेक्टरच्या माध्यमातून भारतीय बाजारात कनेक्टेड कारची संकल्पना आणणाऱ्या एमजीने यावेळी ग्राहकांना अधिक फीचर्स, हाय-टेक सेफ्टी आणि आकर्षक किंमत देण्याचा नवा डाव टाकला आहे.

नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
एमजी मोटर इंडियाने काही वर्षंपूर्वी भारतीय बाजारपेठेत इंटरनेटवाली कार लाँच करून धुमाकूळ उडवून दिला होता. एमजीची ही पहिली कार हेक्टर होती. आता या हेक्टरचे नवीन फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्यात आले आहे. हे करताना कंपनीने आधीच्या हेक्टरपेक्षा दोन लाख रुपयांनी किंमत कमी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
एमजी हेक्टर फेसलिफ्टची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹११.९९ लाख ठेवण्यात आली आहे. ही 'इंट्रोडक्टरी प्राइस' जुन्या मॉडेलच्या तुलनेत जवळपास ₹२ लाख रुपयांनी कमी आहे. हेक्टरच्या माध्यमातून भारतीय बाजारात कनेक्टेड कारची संकल्पना आणणाऱ्या एमजीने यावेळी ग्राहकांना अधिक फीचर्स, हाय-टेक सेफ्टी आणि आकर्षक किंमत देण्याचा नवा डाव टाकला आहे.
मोठ्या ग्रिलमध्ये हनीकॉम्ब डिझाइन, नवीन लूक असलेला एअर डॅम, रीडिझाइन केलेले अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. नवीन ड्युअल-टोन अर्बन टॅन इंटिरियर देण्यात आले आहे. १४ इंचाचा व्हर्टिकल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, i-Swipe जेस्चर कंट्रोल तंत्रज्ञान, लेव्हल-२ ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम, ६ एअरबॅग्ज आणि ३६०-अंशाचा कॅमेरा, डिजिटल ऑटो की, प्रॉक्सिमिटी लॉक-अनलॉक, पॅनोरॅमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स आदी देण्यात आले आहे.
इंजिनाबाबत मात्र कंपनीने आधीच्याच मॉडेलची इंजिन कायम ठेवली आहेत. १.५-लीटर टर्बो पेट्रोल (मॅन्युअल आणि CVT) आणि २.०-लीटर डिझेल (फक्त मॅन्युअल) चे जुने पर्याय कायम ठेवण्यात आले आहेत. नवीन एमजी हेक्टर फेसलिफ्ट एकूण ६ व्हेरियंट्समध्ये (स्टाइल, सिलेक्ट प्रो, स्मार्ट, स्मार्ट प्रो, सॅवी प्रो आणि शार्प प्रो) उपलब्ध आहे. यामध्ये ५-सीटर आणि ७-सीटर (हेक्टर प्लस) दोन्ही कॉन्फिगरेशन मिळतील. कंपनीने या कारची बुकिंग आजपासून सुरू केली आहे. डिझेल व्हेरिअंटची किंमत येत्या काळात जाहीर केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.