मॉरिस गॅरेज या ब्रिटीश कंपनीने भारतीय बाजारात इलेक्ट्रीक स्पोर्ट कार लाँच केली आहे. सायबरस्टर असे या कारचे नाव असून याची सुरुवातीची किंमत कंपनीने ७२ लाख रुपये ठेवली आहे. ही किंमत ज्यांनी आधीच कार बुक केली आहे त्यांच्यासाठी असणार आहे. आता जे बुकिंग करतील त्यांना ही कार ७५ लाख रुपये एक्स शोरुम किंमतीला मिळणार आहे.
MG Cyberster ही कार स्पोर्ट सुपर कार असल्याने कमी उंचीची आहे. या कारचा व्हीलबेस हा 2,690 मिमी आहे. कन्वर्टिबल बॉडी स्टाइल असल्याने या कारचा रुफ उघडता येणार आहे. एमजी सायबरस्टरमध्ये ड्युअल-मोटर AWD सेटअप आहे, जो ३७५kW आणि ७२५Nm टॉर्क निर्माण करतो. ३.२ सेकंदात ही कार १०० चा वेग गाठते.
७७kWh बॅटरी पॅक ५८०km (MIDC) पर्यंतची रेंज देते. १०० च्या स्पीडला असताना ही कार केवळ ३३ मीटर एवढ्या कमी अंतरात थांबू शकते असे तिला सस्पेंशन आणि ब्रेक सिस्टीम देण्यात आली आहे. लेव्हल २ एडीएएस, रिअल-टाइम ड्रायव्हर मॉनिटरिंग सिस्टम, चार एअरबॅग्ज, ईएससी आणि इलेक्ट्रॉनिक डिफरेंशियल लॉक अशी सेफ्टी फिचर देण्यात आली आहेत.
एमजीने यावर तीन वर्षे किंवा १ लाख किमी ची वॉरंटी दिलेली आहे. तसेच कारसोबत ३.३ किलोवॅट पोर्टेबल चार्जर, ७.४ किलोवॅट वॉल बॉक्स चार्जर आणि इंस्टॉलेशन देण्यात येणार आहे. या कारमध्ये आठ-स्पीकर, ३२०W बोस ऑडिओ सिस्टम देण्यात येत आहे. १०.२५-इंच सेंट्रल टचस्क्रीनसह ट्राय-क्लस्टर डिस्प्ले आणि सात-इंच सेकंडरी आणि टर्शरी पॅनेल देण्यात येत आहे. ही कार चार रंगात उपलब्ध होणार आहे. कॉस्मिक सिल्व्हर, इंका येलो, इंग्लिश व्हाइट आणि डायनॅमिक रेड असे रंग असे हे रंग असणार आहेत.