शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

Mercedes-Benz Vision EQXX: जबरदस्त..! भारतात आली सर्वात दमदार Electric Car, एकदा चार्ज करा आणि महिनाभर विसरून जा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:08 IST

या कारची रेंज वाढविण्यासाठी कारच्या छतावर एक सोलर पॅनलही सेट करण्यात आले आहे. यामुळे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते.

लक्झरी कार मेकर कंपनी मर्सिडीज बेन्झने काही महिन्यांपूर्वीच भारतीय बाजारात आपली mercedes-benz EQS 580 ही इलेक्ट्रिक कार  लॉन्च केली होती. अतापर्यंत ही देशातील सर्वाधिक रेंज देणारी इलेक्ट्रिक कार होती. ही कार फुल चार्जवर 857 KM ची रेंज देत होती. आता कंपनीने भारतीय बाजारात पुन्हा एकदा दमदार इलेक्ट्रिक कार Mercedes Benz Vision EQXX सादर केली आहे. ही कार एकदा चार्ज केल्यानंतर, 1000 किलोमीटरपर्यंत चालू शकते. व्हिजन EQXX ईव्हीची कन्सेप्ट याच वर्षाच्या सुरुवातीला जगासमोर सादर करण्यात आली होती. 

महिनाभर चालणार बॅटरी -कंपनीने या कारच्या परफॉर्मन्सपेक्षाही हिच्या एफिशिअन्सीवर अधिक भर दिला आहे. या कारला सिंगल इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. जी 244hp (180kW) जनरेट करते. एवढेच नाही, तर 100kWh ची बॅटरीही या कारला देण्यात आली आहे. जी 900V पर्यंतची चार्जिंग स्पीडला सपोर्ट करते.

या कारची रेंज वाढविण्यासाठी कारच्या छतावर एक सोलर पॅनलही सेट करण्यात आले आहे. यामुळे बॅटरीची रेंज एका दिवसात 25KM पर्यंत वाढते. मात्र, या सौर पॅनलमुळे रियर विंडो झाकली जाते. यामुळे गाडी चालवताना समस्या येऊ शकते. जर आपण महिन्यातील 25 दिवस रोज 20KM पर्यंत ऑफिसात जात असाल, तर या  कारची बॅटरीसंपूर्ण एक महिन्यापर्यंत चालू शकते.  

डिझाईन बघूनच प्रेमात पडाल - मर्सिडीजची ही इलेक्ट्रिक कार डिझाईनच्या दृष्टीनेही आकर्षक आहे. कारच्या समोरील भागात एक LED लाइटबार देण्यात आला आहे. हिच्या बोनटवर मर्सिडीज बेन्झचा लोगो स्टिकरच्या स्वरुपात देण्यात आला आहे. तसेच हिचे डिझाइनही अत्यंत एअरोडायनॅमिक ठेवण्यात आले आहे. या कारला फ्लश डोअर हँडलही देण्यात आले आहे. या कारमध्ये बरेच रिसायकल्ड मटेरियल्स वापरण्यात आले आहेत. याच बरोबर ही एक लाइटवेटेड कार आहे. हिचे व्हर्जन केवळ 1750 किलोग्रॅम एवढे आहे. 

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झcarकारAutomobileवाहन