शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
4
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
5
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
6
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
7
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
8
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
9
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
10
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
11
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
12
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
13
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
14
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
15
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
16
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
17
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
18
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
19
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
20
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...

McLaren Cars Launched: व्रुम...व्रुम...sss फॉर्म्युला 1 च्या कार बनविणाऱ्या कंपनीची भारतात एन्ट्री; मॅक्लॅरेनने पहिले शोरुम उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:18 IST

दोन वर्षांपूर्वी McLaren ही कंपनी भारतीय बाजारात उतरण्याबाबत अभ्यास करत असल्याच्या चर्चा होत्या.

जगभरात आपल्या स्पोर्ट्स कारसाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रिटनची कार निर्मात कंपनी मॅक्लॅरेनने (McLaren) भारतात अधिकृतरित्या एन्ट्री केली आहे. मायानगरी मुंबईत या कंपनीने आपला पहिला शोरुम उघडला आहे. कंपनीने आपल्या काही कार भारतात आणल्या आहेत. 

प्राइवेट इंपोर्ट इन्फिनिटी कार्स ही कंपनीची भारतातील अधिकृत डीलरशीप आहे. नवीन शोरुम सुरु करतानाच कंपनीने मुंबईतच पहिले सर्व्हिस सेंटर देखील सुरु केले आहे. यासाठी प्रशिक्षित इंजिनिअर नियुक्त करण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वी McLaren ही कंपनी भारतीय बाजारात उतरण्याबाबत अभ्यास करत असल्याच्या चर्चा होत्या. इन्फिनिटी कार्सचे कार्यकारी अध्यक्ष ललित चौधरी यांनी याबाबत सांगितले की आम्ही २०१६ पासून मॅक्लॅरेनला भारतात आणण्याची तयारी करत होतो. 

ब्रँडसाठी भारत एक प्रमुख बाजारपेठ बनण्याची कंपनीची अपेक्षा आहे. GT, Artura ते 765LT स्पायडर सारख्या सर्व श्रेणीतील कार भारतात आणण्यात येणार आहेत. कंपनीने लाँचच्या वेळी आपली स्पाईड श्रेणी देखील प्रदर्शित केली. ही कार दोन प्रकारांमध्ये येते, ज्यात 765LT आणि 720S समाविष्ट आहे.

McLaren 765LT Spider765LT या कारमध्ये कंपनीने 4.0-लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 इंजिन वापरले आहे जे 765hp ची मजबूत पॉवर आणि 800Nm टॉर्क जनरेट करते. कंपनी सध्या याचे फक्त 765 युनिट्स ऑफर करणार असून भारतीय बाजारात त्याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. याला फोल्डिंग रूफ देखील मिळते जे फक्त 11 सेकंदात उघडते आणि बंद होते.

McLaren 720S Spider:  कंपनीने या कारची किंमत 5.04 कोटी रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. यात 4.0 लिटर क्षमतेचे ट्विन-टर्बोचार्ज केलेले V8 इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 720hp ची मजबूत शक्ती आणि 770Nm टॉर्क निर्माण करते. केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग घेते. रुफसह तिचा टॉप स्पीड 341 किमी प्रतितास आहे आणि रुफ दुमडल्यावर ही कार 325 किमी प्रतितास वेगाने धावते.

टॅग्स :carकार