maruti suzuki wagon r s cng bs6 launched in india | Marutiनं लाँच केली WagonR S-CNG, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Marutiनं लाँच केली WagonR S-CNG, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियानं नव्या WagonR S-CNGचा बीएस -6 उत्सर्जन मानकांशी सुसंगत सीएनजी मॉडल लाँच केलं आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6ची शोरूम किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6चं मॉडल उत्सर्जन मानकांचं पालन करत सादर करण्यात आलं आहे.

WagonR S-CNGचा बीएस -6 ची 60 लीटर इंधनाची टाकी असून, 32.52 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते. (सामान्यत: किलोग्रॅममध्ये सीएनजी मोजला जातो. परंतु येथे इंधन टाकीचा आकार लिटरमध्ये सांगितला आहे.) कंपनीनं WagonR S-CNGचा बीएस -6चे दोन मॉडेल एलएक्सआय (Lxi) आणि एलएक्सआय (ओ) LXi(O)ला बाजारात उतरवलं आहे. या मॉडेलची किंमत क्रमशः 5.25 लाख रुपये आणि 5.32 लाख रुपये आहे.

कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, मिशन ग्रीन मिलियनची घोषणा करत आम्ही देशाच्या पर्यावरणाला अनुकूल अशी गाडी तयार केली असून, पर्यावरणपूरक गाड्या तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कंपनीनं ऑटो एक्स्पोमध्ये या गाड्या सादर केल्या होत्या. मिशन ग्रीन मिलियनअंतर्गत काही वर्षांत सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे 10 लाख युनिट्स विकण्याचा कंपनीचा मानस असल्याचं श्रीवास्तव म्हणाले. 


WagonR S-CNGच्या व्हेरिएंटमध्ये 998ccसह तीन सिलिंडरवालं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जी 5500rpmवर 58 हॉर्स पॉवर ताकद आणि 3500rpmवर 78Nmचा टॉर्क निर्माण करते. ही फक्त 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते. कारण सीएनजी मॉडलमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय नाही.  

English summary :
Maruti Suzuki : Maruti Suzuki WagonR S-CNG BS6 has been launched in India. You can visit Lokmat.com for to know about the price and features of the WagonR S-CNG BS6.

Web Title: maruti suzuki wagon r s cng bs6 launched in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.