मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:47 IST2025-09-18T19:43:36+5:302025-09-18T19:47:02+5:30
Maruti Suzuki Car GST: मारुतीची सर्वात स्वस्त कार कुठली असा जर कोणाला प्रश्न विचारला तर सर्वजण अल्टोचे नाव घेतील. परंतू, आता तसे राहिलेले नाही.

मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
सध्या जीएसटीने गेले काही दिवस ऑटो, इलेक्ट्रॉनिक बाजारात धुमाकूळ उडवून दिलेला आहे. जीएसटी कमी झाल्याने २२ तारखेपर्यंत कोणी शोरुममध्ये फिरकत सुद्धा नाहीय. २२ तारखेपासून या शोरुममध्ये नुसती झुंबड उडणार आहे. या जीएसटीने अनेक गोष्टी पालटल्या आहेत. यात मारुती कंपनी देखील सुटलेली नाही.
मारुतीची सर्वात स्वस्त कार कुठली असा जर कोणाला प्रश्न विचारला तर सर्वजण अल्टोचे नाव घेतील. परंतू, आता तसे राहिलेले नाही. एस प्रेसो २० हजारांनी का होईना मारुतीच्या अल्टोपेक्षा स्वस्त झाली आहे. एस प्रेसोची किंमत सर्वाधिक म्हणजेच १.२९ लाखांनी कमी झाली आहे. मारुती अल्टो के १० ही ३.६९ लाखांपासून सुरु होते तर एस प्रेसो ही ३.४९ लाखांनी सुरु होत आहे.
मारुतीची सर्वाधिक खपाची डिझायर ही कार ८७,७०० रुपयांनी कमी झाली आहे. बलेनो ८६ हजार, तर स्विफ्ट ८४,६०० रुपयांनी कमी झाली आहे. मारुतीच्या या कारमध्ये आता केवळ २० हजारांचा फरक आलेला आहे. यामुळे लोकांना कोणती कार घेऊ कोणती नको अशी गोंधळात टाकणारी परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे.