Maruti Suzuki Alto लाँच; 31 किमी मायलेजचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 16:01 IST2020-01-27T16:01:25+5:302020-01-27T16:01:51+5:30
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची सर्वात छोटी कार अल्टो लाँच केली आहे

Maruti Suzuki Alto लाँच; 31 किमी मायलेजचा दावा
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने त्यांची सर्वात छोटी कार अल्टो लाँच केली आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन पर्यायांमध्ये आली आहे. मारुतीने बीएस ६ मानांकनात बसणारी सीएनजी कारचे दोन व्हेरिअंट आणले आहेत.
अल्टोची सीएनजी कार 31.59 किमीचे मायलेज देत असल्याच दाव कंपनीने केला आहे. Maruti Suzuki S-CNG ही दोन ईसीयू म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट आणि इंटेलिजेंट इंजेक्शन सिस्टमने युक्त आहे. अशा प्रकारची वाहने खास पद्धतीने ट्यून केली जातात. तसेच चांगल्या प्रदर्शनासाठी कॅलिब्रेट केली जाते.
मारुतीचे कार्यकारी अधिकारी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितले की, मारुती सुझुकीच्या उत्पादनांमध्ये नेहमीच आम्ही पर्यावरणपूरक बदल करत असतो. अल्टोमध्ये बीएस-६ चे इंजिन सुरक्षा आणि जास्तीत जास्त चालणारे दिले आहे. मायलेजही चांगले आहे. आमचे ग्राहक या सीएनजी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते.
या नव्या सीएनजी कारची दिल्लीची एक्स शोरुम किंमत 4,32,700 रुपये ठेवण्यात आली आहे. तर दुसरे मॉडेल ऑप्शनल असून त्याची किंमत 436,300 रुपये आहे.