मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:16 IST2025-11-07T12:16:15+5:302025-11-07T12:16:54+5:30
Maruti car Discount : मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिस ही कार लाँच केली होती. फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग, सर्व अपडेटेड फिचर्स आणि अंडरबॉडी सीएनजी टँक यामुळे ही कार मारुतीसाठी गेमचेंजर बनण्याची शक्यता आहे.

मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
प्रीमियम एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली मजबूत पकड बनविण्यासाठी मारुती सुझुकीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी व्हिक्टोरिस ही कार लाँच केली होती. फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंग, सर्व अपडेटेड फिचर्स आणि अंडरबॉडी सीएनजी टँक यामुळे ही कार मारुतीसाठी गेमचेंजर बनण्याची शक्यता आहे. अशातच या सेगमेंटमध्ये आपली जागा बनविण्यात अपयशी ठरलेली एसयुव्ही मारुती ग्रँड व्हिटारा याची ही कार जागा घेण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे. मारुतीने याच कमी खप असलेल्या कारवर डिस्काऊंटची रक्कम वाढविली आहे.
नोव्हेंबर २०२५ साठी मारुती सुझुकीने आपल्या गाड्यांवर मोठी सवलत जाहीर केली आहे. कंपनीची लोकप्रिय एसयूव्ही मारुती ग्रँड विटारा वर ग्राहकांना तब्बल २ लाख १० हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो. ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत कंपनीने या एसयूव्हीवरील सवलतीत ५४,००० रुपयांची वाढ केली आहे.
ग्रँड विटाराचे वैशिष्ट्ये: ग्रँड विटाराची एक्स-शोरूम किंमत आता १०.७६ लाख रुपयांपासून सुरू होते. या एसयूव्हीचे स्ट्रॉंग हाइब्रिड मॉडेल २७.९७ किमी/लीटर इतके उत्कृष्ट मायलेज देते. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार फुल टँकवर १२०० किमी पर्यंत धावू शकते.
टेक्नोलॉजी: यामध्ये पॅनोरामिक सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेरा, वायरलेस चार्जिंग, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स सारखे फीचर्स मिळतात.
ज्या ग्राहकांना प्रीमियम एसयूव्ही विकत घ्यायची आहे, त्यांच्यासाठी नोव्हेंबरमधील ही बंपर सवलत एक उत्तम संधी आहे. तथापि, सवलतीची नेमकी रक्कम शहर आणि डीलरनुसार बदलू शकते, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी सवलतीची सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.