शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीची नवी सियाझ लाँच; वाचा किंमत, मायलेज अन् बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 17:09 IST

हायब्रिड-अॅटोमॅटीक प्रकारासह पेट्रोल, डिझेलमध्येही उपलब्ध

नवी दिल्ली : देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीने आपली प्रिमियम श्रेणीतील सियाझ ही सेदान कार नव्या रुपात लाँच केली आहे. या कारची एक्स-शोरुम (दिल्ली) सुरुवातीची किंमत 8.19 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. नेक्सा या ब्रँडअंतर्गत या कारचे डिझेल आणि पेट्रोलमध्ये 11 व्हेरिएंट्स ठेवण्यात आले आहेत.

मारुतीने 2014 मध्ये पहिल्यांदाच होंडा सिटीला टक्कर देण्यासाठी सियाझ भारतीय बाजारात उतरवली होती. आज मारुतीने या कारचे नवे रुपडे बाजारात आणले आहे. पुढील भाग आकर्षक दिसण्यासाठी ग्रीलना नव्या स्वरुपात डिझाईन केले गेले आहे. ग्रीलवर क्रोम स्ट्रीप लावण्यात आली आहे. याचबरोबर प्रोजेक्टर हेडलँप नव्या रुपात दिले गेले आहेत. यामध्ये एलईडी डेटाइम रनिंग लाईटही दिली गेली आहे. तर फॉग लॅम्प अपडेट करण्यात आले आहे. टारही बाजुला मेटल फिनीश देण्यात आले आहे. 

नव्या सियाझमध्ये मागील लाईटला नवे लायटिंग सिग्नेचक आणि बदललेला बंपर मिळणार आहे. तसेच नवे अलॉय व्हील्सही खास आहेत.

 अंतर्गत रचना सियाझची अंतर्गत रचना पहिल्यापेक्षा आकर्षक करण्यात आली आहे. इंन्स्ट्रूमेंट क्लस्टरवर 4.2 इंचाची टचस्क्रीन, अतिरिक्त माहिती आणि रंगात देण्यात आली आहे. तसेच इन्फोटेनमेंट सिस्टिममध्ये पहिल्यापेक्षा चांगली म्युझिक सिस्टिम, नेव्हीगेशन आणि युएसबी कनेक्टीव्हीटी देण्याती आली आहे. 

नवे काय?नव्या सियाझमध्ये पुश/स्टार्ट - स्टॉप बटन, क्रुझ कंट्रोल, इलेक्ट्रिक आरसे, किलेस एन्ट्री, ऑटो एसी, पाठीमागे एसी व्हेंट, आर्मरेस्ट, ड्रायव्ला हाईट अॅडजस्ट करणारी सीट, अॅटोमॅटीक हेडलॅम्प, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि स्पीड अलर्ट सिस्टिम देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी दोन एअरबॅग, इबीडी, एबीएस आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

इंजिन क्षमता आणि मायलेजसियाझमध्ये 1.5 लिटर के 15 बी पेट्रोल इंजिन आणि 1.3 लिटर डीडीआयएस डिझेल इंजिन देण्यात आले आहे. दोन्ही इंजिने हायब्रिड सुविधेसहीत देण्यात आली आहेत. सियाझमध्ये एकूण 11 व्हेरिअंट सात रंगात उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे पेट्रोल कार 22.52 किमी प्रती लिटर आणि डिझेल 28.09 किमी प्रती लिटर मायलेज देणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग