शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

Maruti नं लाँच केली नवी CNG कार, ३२ किमीचं मायलेज आणि फीचर्सही कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2022 16:07 IST

उत्तम फीचर्ससह ही कार लाँच करण्यात आली आहे. जाणून घ्या कोणती आहे ही कार आणि किती आहे किंमत.

बाजारपेठेत सध्या सीएनजी कारचे वर्चस्व कायम आहे. अशा परिस्थितीत भारतातील आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रँड मारुती सुझुकीने आणखी एक सीएनजी कार अत्यंत कमी किमतीत लाँच केली आहे. मारुती सुझुकीने त्यांच्या मायक्रो एसयूव्ही एस-प्रेसो, मारुती एस-प्रेसोचं नवं व्हर्जन Maruti S-Presso S CNG लाँच केली आहे. मारुती सुझुकीचा दावा आहे की ही कार सीएनजीवर 32.73 किमी प्रति किलो मायलेज देईल. त्याला ARAI कडूनही प्रमाणित करण्यात आले आहे.

Maruti S Presso S CNG मध्ये कंपनीने 1.0 लीटर ड्युअल जेट, ड्युअल VVT नेक्स्ट जनरेशन के सीरिज इंजिन दिले आहे. S-Presso S-CNG इंजिन 5,300 RPM वर 41.7kW (56.69 PS) चे पीक पॉवर आउटपुट आणि CNG मोडमध्ये 3,400 RPM वर 82.1Nm कमाल टॉर्क जनरेट करते. पेट्रोलवर चालणारे, हे इंजिन 5,500 rpm वर 65.26 PS पीक पॉवर आणि 3,500 rpm वर 89 Nm टॉर्क निर्माण करते. S-Presso 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स तसेच 5-स्पीड AMT सह उपलब्ध आहे. मारुती एस-प्रेसो एस-सीएनजी 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार्य करते.

जबरदस्त फीचर्स मारुतीने या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेच्या कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे. यासोबतच कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर विंडो, कीलेस एंट्री, पुढच्या सीटवर ड्युअल एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट, EBD सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटबेल्ट रिमाइंडर यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

किती आहे किंमत?केवळ S-Presso LXi S-CNG आणि VXi S-CNG व्हेरिअंटमध्ये CNG देण्यात येत आहे. त्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, LXi S-CNG व्हेरिएंटची किंमत 5.9 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. त्याच वेळी, VXi S-CNG व्हेरिअंटची किंमत 6.10 लाख (एक्स-शोरूम) आहे. मारुती सुझुकीकडे सध्या 10 S-CNG मॉडेल्स आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन